टाटा कम्युनिकेशन्सचे एमडी आणि सीईओ विनोद कुमार यांचा राजीनामा

वृत्तसंस्था
Wednesday, 3 July 2019

मुंबई: टाटा कम्युनिकेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा विनोद कुमार यांनी आज (2 जुलै) दिला आहे. त्यांचा राजीनामा 5 जुलैपासून लागू होणार आहे. टाटा कम्युनिकेशन्सच्या संचालक मंडळाने विनोद कुमार यांच्या जागी नवीन नियुक्ती करण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. विनोद कुमार टाटा कम्युनिकेशन्समध्ये एप्रिल 2004 मध्ये रुजू झाले होते. त्याच सुमारास कंपनीने आपल्या आंतरराष्ट्रीय कामकाजाची सुरूवात केली होती. 

विनोद कुमार यांचा जागतिक दूरसंचार क्षेत्रात काम करण्याचा 25 वर्षांचा अनुभव आहे. टाटा कम्युनिकेशन्सआधी ते 2002-2004 या कालावधीत एशिया नेटकॉमचे वरिष्ठ उपाध्यक्ष होते. त्याहीआधी विनोद कुमार 1999 ते 2002 या कालावधीत वर्ल्डकॉम जपानचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्याव्यतिरिक्त त्यांनी अमेरिकेतील आणि आशियातील अनेक कंपन्यांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. विनोद कुमार यांनी बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅंड सायन्स येथून इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगची पदवी घेतलेली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tata Communications CEO and MD Vinod Kumar resigns