
टाटासमूहाने प्रथमच वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांचा पगार कपातीचा निर्णय घेतला आहे.टाटासमूहातील विविध कंपन्यांचे मुख्यकार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या वेतनात 20टक्के कपात करण्यात येणार आहे
मुंबई - कोरोना संकटामुळे टाटा समूहाने आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी टाटा समूहाने इतिहासात प्रथमच वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांचा पगार कपातीचा निर्णय घेतला आहे. टाटा समूहातील विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या (एमडी) वेतनात 20 टक्के कपात करण्यात येणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
यामध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष आणि सहाय्यक कंपन्यांच्या सर्व सीईओंचा समावेश आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच संकट काळात समूहावरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.
जगावर राज्य करण्यासाठी चीनचे नवे अस्त्र : डिजिटल युआन
टाटा सन्स समूहातील महत्त्वाची आणि सर्वाधिक महसूल मिळवून देणारी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सीईओ राजेश गोपीनाथन यांच्या पगारात कपात करण्याची घोषणा केली. तर इंडियन हॉटेल्स (ताज) वरिष्ठांच्या या तिमाहीतील पगाराचा एक भाग कंपनीला झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून देण्याचा निर्णय घेतला.
''सरकारने तात्काळ प्रत्येक नागरिकाला दर महिन्याला १,००० रुपयांची कॅश द्यावी''
* टाटा समूहाने इतिहासात प्रथमच घेतला वेतन कपातीचा निर्णय
* वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांचा पगार कपातीचा निर्णय
* टाटा समूहातील इंडियन हॉटेल्स (ताज), टाटा मोटर्स आणि टाटा एसएआय एअरलाईन्सला (विस्तारा) सर्वाधिक फटका
टाटा समूहातील 'या' कंपन्यांना सर्वाधिक फटका
कोरोनाचा सर्वाधिक फटका टाटा समूहातील तीन कंपन्यांना बसला आहे. यामध्ये इंडियन हॉटेल्स (ताज), टाटा मोटर्स आणि टाटा एसएआय एअरलाईन्सला (विस्तारा) सर्वाधिक फटका बसला आहे. कारण कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात पर्यटन, वाहन विक्री आणि विमान वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
समूहातील या कंपन्यांचे सीईओ कमी पगार घेणार
टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा इंटरनॅशनल, टाटा कॅपिटल तसेच वोल्टास या सर्व कंपन्यांचे सीईओ आणि एमडी कमी पगार घेणार आहेत. चालू आर्थिक वर्षात कंपन्यांच्या बोनसमध्ये देखील कपात केली जाणार
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कंपनीने आर्थिक वर्ष 2018 ते 19 दरम्यान सीईओंच्या मानधनात 11 टक्क्यांची वाढ केली होती. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना 65.52 कोटी रुपये मानधन मिळाले होते. त्यामध्ये आर्थिक वर्ष 2019 मध्ये टाटा सन्सला मिळालेल्या नफ्यावरील कमिशनपोटी 52 कोटी रुपयांचा समावेश आहे. टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांच्या मानधनात 16.5 टक्क्यांची घसरण झाली. ते गेल्यावर्षीच्या 16.04 कोटींवरून कमी होत 13.3 कोटींवर आले आहे.
कंपनी एमडी व सीईओ आर्थिक वर्ष 2019 मध्ये मिळालेले मानधन (कोटींमध्ये)
1. टाटा सन्स एन.चंद्रशेखरन 65.52
2.टाटा मोटर्स गुएंटर बुश्चेक 26.29
3.टीसीएस राजेश गोपीनाथन 13.38
4. टाटा स्टील टीव्ही नरेंद्रन 11.23
5. टायटन भास्कर भट 6.93
6. इंडियन हॉटेल पुनीत चटवाल 6.02
7. व्होल्टास प्रदीप बक्षी 4.51