जगावर राज्य करण्यासाठी चीनचे नवे अस्त्र : डिजिटल युआन

जगावर राज्य करण्यासाठी चीनचे नवे अस्त्र : डिजिटल युआन

बिजिंग -  जागतिक आर्थिक साम्राज्य वाढवू पाहणारा चीन  2022 मध्ये डिजिटल युआन चलन आणण्याची तयारी करत आहे. चीन ईआरएमबी नावाने हे डिजिटल युआन आणण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये चीनमध्ये जाणाऱ्या लोकांना डिजिटल चलनाच्या माध्यमातून व्यवहार करावे लागू शकतात. 

कोरोना संकटात संधी:
सध्या जगभरात कोरोनामुळे प्रत्येक देश संकटाचा सामना करत आहे. चीन मात्र एक पाऊल पुढे टाकत डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देत प्रायोगिक तत्वावर डिजिटल चलनाचा वापर सुरू केला आहे. 

गेल्या महिन्यात चीनची मध्यवर्ती बँक असलेल्या पीपल्स बँक ऑफ चायनाने  शेंजेन, चेंगदु, सुजो आणि जिओंगान या चार शहरांमध्ये यावर काम सुरू केले आहे. या योजनेंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनाचा काही भाग देखील डिजिटल चलनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. 

चीनने खासगी क्षेत्रातील काही कंपन्यांना देखील या डिजिटल चलनाच्या प्रयोगामध्ये सहभाग घेतला आहे. स्टारबक्स आणि मॅकडॉनल्ड सारख्या कंपन्यांनी देखील चीनच्या या प्रयोगामध्ये सहभाग घेतला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास चीन 2022 पर्यंत संपूर्ण देशात डिजिटल चलनाचा वापर सुरू करेल. टप्याटप्याने संपूर्ण देशभरात लागू केले जाण्याची शक्यता असून चीनने 2014 मध्ये डिजिटल चलनाचे काम सुरू केले होते. आता मात्र चीन वेगाने काम सुरू केले आहे. 

* चीन करतोय डिजिटल युआन चलन आणण्याची तयारी 
* ईआरएमबी नावाने डिजिटल युआन
* स्टारबक्स आणि मॅकडॉनल्ड सारख्या कंपन्यांनी देखील चीनच्या या प्रयोगामध्ये सहभाग
* अमेरिकेसोबत वाढत्या व्यापारी युद्धावर उपाय शोधण्याचा चीनचा प्रयत्न

डिजिटल करन्सी आणण्याची घाई का?
1. अमेरिकेसोबत वाढते व्यापारी युद्ध
2. कोरोनामुळे अमेरिकेबरोबरच पश्चिमेकडील देशांसोबत बिघडते संबंध
3.फेसबुक डिजिटल करन्सी लिब्रा चालू वर्षात आणण्याची शक्यता आहे.

चीन डिजिटल युआन आणून जागतिक संतुलनात बदल करण्यासाठी प्रयत्न करत आहे. चीनचा हा महत्त्वकांशी प्रकल्प असून या माध्यमातून अमेरिकेचे वर्चस्व संपविण्याचा विचार आहे. शिवाय 21 व्या शतकातील 'सुपरपॉवर' म्हणून पुढे येण्याची चीनची इच्छा आहे. 

डिजिटल चलन आणण्यासाठी चढाओढ: जगभरातील विकसित देश डिजिटल चलन आणण्याची तयारी करत आहे. अमेरिका देखील 'डिजिटल डॉलर' तर भारत 'लक्ष्मी' नावाने डिजिटल चलन आणू पाहत आहेत. मात्र चीनने यात आघाडी घेतली आहे. याचा फटका अमेरिकी डॉलरला बसण्याची शक्यता आहे.

अमेरिकी डॉलरचा बोलबाला:
1. अमेरिकी डॉलरचा जगभरात बोलबाला आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर सुमारे 90 टक्के व्यवहार हे अमेरिकी डॉलरच्या माध्यमातून पार पडले आहेत. तर चीनच्या चलनाचा 2 टक्के वापर झाला आहे. 

2. जगभरातील देशांच्या परकी गंगाजळीमध्ये 60 टक्के अमेरिकी डॉलरचा समावेश आहे. 

3.भारताच्या परकी गंगाजळी मध्ये 487 अब्ज अमेरिकी डॉलर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com