फक्त वर्षभरात गुंतवणुकदारांचे पैसे केले दुप्पट; टाटा समूहाचा कोणता आहे हा शेअर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TATA groups

बाजारात सतत चढ-उतार होत असतात. पण काही शेअर्स असे आहेत की बाजारातील चढ-उताराचा त्यांच्यावर फारसा फरक पडत नाही. सध्या असे बरेच स्टॉक आहेत, जे चांगला परतावा देऊ शकतात.

'या' शेअरने फक्त वर्षभरात गुंतवणुकदारांचे पैसे केले दुप्पट

sakal_logo
By
शिल्पा गुजर

Tata Group Tata Steel Stock Price: टाटा समुहाच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना कायमच नफा करुन दिला आहे. त्यातही टाटा समूहाचा एक मजबूत स्टॉक म्हणजे टाटा स्टील. या शेअर्समध्ये एवढ्या तेजीनंतरही 50 टक्क्यांहून अधिक परतावा देण्याची आणखी क्षमता आहे. टाटा स्टीलच्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे पैसे केवळ एका वर्षात दुप्पट केले आहेत.

52 टक्के परतावा मिळण्याची आशा

आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहीत टाटा स्टीलची कामगिरी चांगली असल्याचे ब्रोकरेज हाऊस आनंद राठींच्या अहवालात म्हटले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीची कामगिरी चांगली राहण्याची अपेक्षा आहे. आगामी काळात कंपन्या स्टीलच्या किमती वाढवू शकतात, ज्याचा फायदा टाटा स्टीलला होईल अशी अपेक्षा आहे. कंपनीवरील कर्ज सतत कमी होत आहे, युरोपियन बाजारपेठेत व्यवसाय सुधारला आहे. देशांतर्गत बाजारपेठेतही वाढीचा वेग कायम आहे. ब्रोकरेज हाऊसने स्टॉकमध्ये 1776 रुपयांचे टारगेट दिले आहे. 1170 रुपयांच्या सध्याच्या किमतीनुसार, त्यात 52 टक्के परतावा मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: टाटा स्टील व टाटा वायरमध्ये कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस

देशांतर्गत मागणीत सुधार

आगामी तिमाहीत देशांतर्गत मागणी आणि किमतीत वाढ झाल्याचा फायदा टाटा स्टीलला मिळेल असे ब्रोकरेज हाउस सेंट्रम ब्रोकिंगच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात नफाही वाढू शकतो. कंपनीने आपले कर्ज सतत कमी केले आहे, ताळेबंद अर्थात बॅलेन्सशीट सुधारली आहे. कंपनी आपले कर्ज आर्थिक वर्ष 2022 मध्ये 54500 कोटी आणि आर्थिक वर्ष 2023 मध्ये 30500 कोटी पर्यंत कमी करू शकते असा विश्वास ब्रोकरेजला आहे. ब्रोकरेजने या स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना 1698 रुपयांचे टारगेट ठेवले आहे.

हेही वाचा: टाटा स्टील शेअर्सचा तगडा परतावा, गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी

1 वर्षाचा मल्टीबॅगर स्टॉक

टाटा स्टील गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या 1 वर्षात गुंतवणूकदारांना 115 टक्के परतावा दिला आहे. यादरम्यान शेअरची किंमत 543 रुपयांवरून 1170 रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याच वेळी, या वर्षी आतापर्यंत स्टॉकने 80 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. सप्टेंबर तिमाहीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीचे एकूण उत्पन्न तिमाही आधारावर 13 टक्क्यांहून अधिक वाढून 60553.63 कोटी झाले आहे. तर वार्षिक आधारावर त्यात 62 टक्क्यांची वाढ झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 12362.44 कोटींचा नफा झाला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top