Tata Group च्या या शेअर्समध्ये एका वर्षात मिळेल 39 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TATA groups

गेले काही दिवस देशांतर्गत बाजारात मोठी घसरण होत आहे.

Tata Group च्या या शेअर्समध्ये एका वर्षात मिळेल 39 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा

गेले काही दिवस देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) मोठी घसरण होत आहे. याच घसरणीत शेअर्स खरेदी करण्याची सोनेरी संधी आहे. तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चांगले शेअर्स समाविष्ट करायचे असतील, तर तुम्ही टाटा ग्रुपच्या (Tata Group) इंडियन हॉटेल्स (The Indian Hotels Company Limited) आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (Tata Consumer Products Limited) या दोन कंपन्यांच्या शेअर्सचा विचार करु शकता, असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ देत आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालनेही या शेअर्सवर बाय रेटींग दिले आहे.

हेही वाचा: Share Market : आज कोणते शेअर्स तुम्हाला देतील तगडी कमाई?

इंडियन हॉटेल्स (Indian Hotels)

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी त्यांच्या टॉप रिसर्च आयडियामध्ये इंडियन हॉटेल्सचा समावेश केला आहे. त्यांनी 265 रुपयांचे टारगेट दिले आहे. वर्षभर हे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. 6 मार्च 2022 ला ट्रेडिंग सत्रादरम्यान इंडियन हॉटेल्सच्या शेअरची किंमत सुमारे 191 रुपये होती. म्हणजेच गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीवरून सुमारे 42 टक्के प्रति शेअर परतावा मिळू शकतो. गेल्या वर्षभराबाबत बोलायचे झाले तर हा शेअर जवळपास 47 टक्क्यांनी वाढला आहे.

हेही वाचा: शेअर बाजार तज्ज्ञांनी तुमच्यासाठी निवडले दमदार शेअर्स

टाटा कंझ्युमर (Tata Consumer)

मोतीलाल ओसवाल यांनी टाटा कंझ्युमरचाही त्यांच्या रिसर्च आयडियामध्ये समावेश केला आहे. ब्रोकरेज हाऊसने त्यांनी 910 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटींग दिले आहे. किमान एका वर्षासाठी शेअर्स होल्ड करायचा सल्लाही दिला आहे. 6 मार्च 2022 ला, ट्रेडिंग सत्रादरम्यान टाटा कंझ्युमरच्या शेअरची किंमत सुमारे 670 रुपये होती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीवरून सुमारे 36 टक्के प्रति शेअर परतावा मिळू शकतो. गेल्या वर्षभराबाबत बोलायचे झाले तर या शेअरमध्ये केवळ 8 टक्के वाढ झाली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Tata Groups Shares Of Indian Hotels And Tata Consumer Products Ltd Will Get Refunds

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Share MarketTata Group
go to top