esakal | करदात्यांनो खुशखबर; ITR भरण्यासाठी मुदत वाढविली 
sakal

बोलून बातमी शोधा

ITR Sakal.jpg

इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीचा कालावधी टॅक्स विभागाने वाढवला आहे.

करदात्यांनो खुशखबर; ITR भरण्यासाठी मुदत वाढविली 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीचा कालावधी टॅक्स विभागाने वाढवला आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या दहा जानेवारी पर्यंत इनकम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. यापूर्वी 31 डिसेंबर ही इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे 2019-20 च्या वित्त वर्षातील इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आगामी वर्षातील दहा तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

2021 पासून भारतात धावणार इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या इलेक्ट्रिक कारविषयी  

तसेच यंदाच्या आर्थिक वर्षात आतापर्यंत 4.37 करोड इनकम टॅक्स रिटर्न जमा झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. तर ज्यांनी अजून पर्यंत इनकम टॅक्स रिटर्न भरलेला नाही व ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्यात येत नाही त्यांनी पुढील महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जमा करू शकतात. याशिवाय आयटीआरचा फॉर्म एक किंवा चारचा उपयोग करून इनकम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. यापूर्वी, इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै नंतर  30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तर त्यानंतर देखील हा कालावधी 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आला होता. आणि आता इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी करण्यात आली आहे.          

नवीन वर्षात घरगुती उपकरणे महागणार 

त्यानंतर, ज्यांच्या खात्याचे ऑडिट होते व ज्यांना आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराचे रिपोर्ट जमा करावे लागतात, त्यांच्यासाठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याचा कालावधी नवीन वर्षाच्या 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी केली आहे. इनकम टॅक्स रिटर्न वेळेवर न भरल्यास दहा हजार रुपये दंड आणि तुरूंगवासाची दंड होऊ शकतो. त्यानंतर, वित्त मंत्रालयाकडून विश्वास योजनेअंतर्गत उत्पन्न जाहीर करण्याची तारीख देखील 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. 

loading image