टीसीएसच्या बायबॅकसाठी रेकॉर्ड डेट निश्चित

वृत्तसंस्था
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

"टीसीएस' कंपनीने  शेअरची पुनर्खरेदी (बायबॅक) जाहीर केली आहे. एकूण खरेदी 16,000 कोटी रुपयांपर्यंतची होणार असून, प्रतिशेअर किंमत 2100 रुपये निश्‍चित केली गेली आहे.

नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) बायबॅकसाठी 18 ऑगस्ट रेकॉर्ड  डेट म्हणून निश्चित केली आहे. टीसीएसचे शेअर गुंतवणूकदार या बायबॅकमध्ये भाग घेऊ शकणार आहेत.  म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यामध्ये 18 ऑगस्टपर्यंत टीसीएसचे शेअर असतील असे गुंतवणूकदार या  बायबॅकमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. 

  "टीसीएस' कंपनीने  शेअरची पुनर्खरेदी (बायबॅक) जाहीर केली आहे. एकूण खरेदी 16,000 कोटी रुपयांपर्यंतची होणार असून, प्रतिशेअर किंमत 2100 रुपये निश्‍चित केली गेली आहे. याअंतर्गत 7.62 कोटी शेअरची पुनर्खरेदी होणार असून, सध्याच्या नियमांप्रमाणे त्यातील 15 टक्के म्हणजेच 1.14 कोटी शेअर्स हे छोट्या (रिटेल) भागधारकांसाठी राखीव आहेत. कंपनीच्या मार्च 2018 च्या वार्षिक अहवालानुसार 6.85 कोटी शेअर हे रिटेल विभागामध्ये आहेत. 

अर्थविषयक अधिक घडामोडींसाठी www.sakalmoney.com भेट द्या 

आज मुंबई शेअर बाजारात टीसीएसचा शेअर 4.90 रुपयांच्या वाढीसहा 1973 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 7 लाख 54 हजार 535.60 कोटींचे बाजारभांडवल आहे. 

कसे होणार बायबॅक? 

ज्यांच्याकडे रेकॉर्ड तारखेला त्या दिवशीच्या बंद भावाप्रमाणे, दोन लाख रुपयांपर्यंत किंवा कमी किमतीचे शेअर आहेत, असे सर्व भागधारक हे "रिटेल' विभागामध्ये येतील. याचा अर्थ पुनर्खरेदीसाठी शेअर स्वीकारण्याची शक्‍यता (रेशो) 17 टक्के येते. म्हणजेच तुम्ही 100 शेअर पुनर्खरेदीसाठी दिले, तर त्यातील 17 शेअर 2100 या किमतीला स्वीकारले जाऊ शकतात. 

आता प्रश्‍न येतो, की रिटेल विभागामध्ये जास्तीत जास्त किती शेअर तुम्ही पुनर्खरेदीकरिता देऊ शकता? आज आपल्याला रेकॉर्ड तारीख आणि त्या दिवसाचा भाव माहीत नाही, पण तो पुनर्खरेदी किमतीपेक्षा (2100) कमीच असेल म्हणून आपण ती किंमत (2100) गृहीत धरली, तर तुम्ही रिटेल विभागामध्ये जास्तीत जास्त 95 शेअर घेऊ शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TCS fixes record date for share buyback