Salary Hike: नवीन वर्षात टाटाने कर्मचाऱ्यांना दिले गिफ्ट; पगारात तब्बल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratan Tata

Salary Hike: नवीन वर्षात टाटाने कर्मचाऱ्यांना दिले गिफ्ट; पगारात तब्बल...

TCS Salary Hike : नवीन वर्षाच्या सुरुवातीपूर्वीच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारात 20 ते 70 टक्के वाढ करणार आहे. यासोबतच कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार आहे. ही वाढ नवीन वर्षापासून लागू होणार आहे.

यासोबतच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या पगारवाढीच्या 4 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचा लाभ मिळेल, असा दावा केला जात होता.

आता कंपनीने एक निवेदन जारी करून या वृत्ताचे खंडन केले असून, ही बातमी पूर्णपणे चुकीची असून त्यात अजिबात तथ्य नाही. सध्या कंपनीने अशी कोणतीही पगारवाढ जाहीर केलेली नाही.

यासोबतच कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्स आणि कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या दाव्यांकडे लक्ष देऊ नये असा सल्ला दिला आहे. TCS ने अलीकडेच सांगितले की, कंपनीचा तिमाही नफा प्रथमच 10,431 कोटींवर पोहोचला आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

अशा स्थितीत कंपनीच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर कंपनी लवकरच आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीची भेट देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती.

2022 मध्ये देशातील आणि जगातील अनेक मोठ्या टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, TCS ने कोणतीही कपात केलेली नाही.

हेही वाचा: Share Market : 'या' शेअर्समध्ये तब्बल 11% तेजी; 3 महिन्यात गुंतवणूकदारांना केले मालामाल

कंपनीने ऑगस्ट महिन्यात एकूण 1,200 नवीन लोकांची भरती केली आहे. दुसरीकडे, जुलै ते सप्टेंबरपर्यंत कंपनीने एकूण 9,840 नवीन लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. सप्टेंबरपर्यंत कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 6,61,171 वर पोहोचली आहे.