सर्व आरोग्य विमा पॉलिसींनी भरावा ओमिक्रॉन उपचाराचा खर्च : IRDAI | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्व आरोग्य विमा पॉलिसींनी भरावा ओमिक्रॉन उपचाराचा खर्च : IRDAI
सर्व आरोग्य विमा पॉलिसींनी भरावा ओमिक्रॉन उपचाराचा खर्च : IRDAI

सर्व आरोग्य विमा पॉलिसींनी भरावा ओमिक्रॉन उपचाराचा खर्च : IRDAI

कोविड-19 (Covid-19) प्रकरणांमध्ये झपाट्याने होणारी वाढ पाहता, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Insurance Regulatory and Development Authority of India - IRDAI) ने सांगितले की, सर्व आरोग्य विमा पॉलिसींना (Health Insurance Policies) ओमिक्रॉनच्या (Omicron) उपचाराचा खर्च कव्हर करावा लागेल. IRDAI ने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सामान्य आणि आरोग्य विमा क्षेत्रातील सर्व आरोग्य विमा पॉलिसी ज्या कोविड-19 च्या उपचारांशी संबंधित खर्च कव्हर करतात, त्या सर्व पॉलिसीज ओमिक्रॉनने संक्रमित लोकांच्या उपचारांचा खर्च देखील कव्हर करतील. (The IRDAI states that all health insurance policies must cover the cost of Omicron treatment)

हेही वाचा: दहशत कोरोनाची... पंजाबमध्ये शाळा-कॉलेज बंद! अनेक निर्बंध लागू

गेल्या वर्षीही इर्डाने दिल्या होत्या सूचना

मागील वर्षी देखील नियामकाने एका प्रेस रीलिजमध्ये म्हटले होते, सर्व नुकसानभरपाई आधारित आरोग्य विमा उत्पादने जी सर्व विमा कंपन्यांद्वारे देऊ केलेल्या हॉस्पिटलायझेशन (Hospitalization) उपचारांचा खर्च, कोविड-19 मुळे हॉस्पिटलायझेशन उपचारांचा खर्च कव्हर करतात. IRDAI च्या प्रेस रीलिजमध्ये असे म्हटले आहे, की विमा कंपन्या त्यांच्या सर्व नेटवर्क प्रदात्यांसोबत (रुग्णालये) एक प्रभावी समन्वय यंत्रणा तयार करतील, जेणेकरून सर्व पॉलिसीधारकांना हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत कॅशलेस सुविधा (Cashless Facility) आणि सर्व पॉलिसीधारकांना जलद सेवा मिळू शकतील.

हेही वाचा: Covid 19 : तिसरी लाट रोखण्यासाठी 12 हजार कोटींचा निधी!

रुग्णालयांसोबत समन्वयाची प्रभावी यंत्रणा तयार करण्याच्या सूचना

IRDAI ने रुग्णालयांना आरोग्य विमा पॉलिसीधारकांना कॅशलेस उपचार प्रदान करण्यासाठी विमा कंपन्यांसोबत केलेल्या सेवा स्तर करारांचा (SLA) सन्मान करण्यास सांगितले होते. देशात झपाट्याने वाढणारी ओमिक्रॉनची प्रकरणे पाहता, विमा नियामकाने सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांना त्यांच्या सर्व नेटवर्क प्रदाते आणि रुग्णालये यांच्याशी समन्वयाची प्रभावी यंत्रणा तयार करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. रुग्णालयात दाखल झाल्यास पॉलिसीधारकाला कॅशलेस पेमेंट सुनिश्‍चित करण्यास सांगितले आहे. एप्रिल 2020 मध्ये देखील कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान सर्व विमा कंपन्यांना जे रुग्णालयांमध्ये उपचाराचा खर्च उचलतात त्यांना कोविड-19 च्या उपचारांशी संबंधित खर्च उचलण्यास सांगितले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top