Share Market : दिवाळीच्या तेजीनंतर बुधवारी शेअर बाजरात पडझड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

जागतिक गुंतवणूकदारांच्या नजरा आता अमेरिकेच्या चलनवाढीच्या आकडेवारीवर आहेत, जी उच्चांकावर राहण्याची शक्यता आहे.

Share Market : दिवाळीच्या तेजीनंतर बुधवारी शेअर बाजरात पडझड

रिऍलिटी, मेटल आणि सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील विक्री, यामुळे बुधवारी शेअर बाजार लाल मार्कींगवर अर्थात घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 80.63 अंकांनी अर्थात 0.13 टक्क्यांनी घसरून 60,352.82 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 27.05 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांनी घसरून 18,017.20 वर बंद झाला.

जागतिक बाजारात चलनवाढीशी संबंधित चिंतेचा परिणाम दिसून येत असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. भारतीय बाजाराची सुरुवात कमजोरीने झाली आणि ती पुर्ण दिवस नेगिटिव्ह राहिली. चीनचा CPI वार्षिक 1.5 टक्क्यांनी वाढला आहे, तर प्रोड्युसर प्राइस इंडेक्स 13.5 टक्क्यांनी वाढली. imported inflation आणि देशांतर्गत पुरवठ्यातील तुटवडा यांचा परिणाम झाल्याचे विनोद नायर म्हणाले. जागतिक गुंतवणूकदारांच्या नजरा आता अमेरिकेच्या चलनवाढीच्या आकडेवारीवर आहेत, जी उच्चांकावर राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: मंगळवारी शेअर बाजारात घसरण, आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

Share Market

Share Market

तांत्रिक दृष्टिकोन

निफ्टीने बुधवारी डेली स्केलवर एक बुलिश कँडल तयार केली आणि सुमारे 27 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. निफ्टीला 18000 च्या वर जायचे असल्यास 18150 आणि 18350 वर राहावे लागेल. निफ्टीला 17850-17777 च्या पातळीवर सपोर्ट दिसत असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चंदन तापडिया म्हणाले.

हेही वाचा: नोव्हेंबर महिन्याची उत्तम सुरुवात! आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

Share Market

Share Market

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- हिन्डाल्को (HINDALCO)

- इंडसइंड बँक (INDUSINDBK)

- टाटा स्टील (TATASTEEL)

- जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

- कोल इंडिया (COALINDIA)

- टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

- गुजरात गॅस (GUJGASLTD)

- एलआयसी हाऊसिंग फायनान्स (LICHSGFIN)

- टोरंट पॉवर (TORNTPOWER)

- पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top