शेअर बाजारात काही अंशी सुधारणा! आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

शेअर बाजारात बुधवारी काहीसे चांगले वातावरण दिसून आले.
Share Market
Share MarketSakal
Summary

सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांनी वाढले तर बँक निफ्टीने सुमारे 2 टक्क्यांची वाढ नोंदवली.

शेअर बाजारात बुधवारी काहीसे चांगले वातावरण दिसून आले. सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांनी वाढले तर बँक निफ्टीने सुमारे 2 टक्क्यांची वाढ नोंदवली. बुधवारी मिडकॅप शेअर्समध्येही चांगली खरेदी झाली. सेन्सेक्स 620 अंकांनी वाढून 57,685 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 184 अंकांनी वाढून 17,167 वर बंद झाला. निफ्टी बँक 670 अंकांनी वाढून 36,365 वर बंद झाला. तर मिडकॅप 305 अंकांनी वाढून 29,956 वर बंद झाला.

बुधवारी निफ्टीमध्ये अस्थिरता थोडी कमी होती आणि त्यामुळे डेली स्केलवर बुलीश कँडल तयार झाल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. आता निफ्टीला 17,350 आणि 17,500 च्या झोनमध्ये जाण्यासाठी 17200 च्या वर स्थिर राहावे लागेल. खाली, 17,000 आणि 16800 वर सपोर्ट दिसत आहे.

Share Market
ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे बाजारात घसरण! आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?
Share Market
Share MarketFile Photo

आज बाजारात काय स्थिती असेल?

निफ्टीने 17,220-17,300 च्या आसपास मजबूत हडल झोन तयार केला आहे, असे LKP सिक्युरिटीजचे रोहित सिंगरे म्हणाले. जोपर्यंत निफ्टी ही पातळी मजबूतपणे तोडत नाही, तोपर्यंत त्यात जोरदार खरेदी होणार नाही. निफ्टीला 17,050-16,950 स्तरांवर मजबूत सपोर्ट दिसत आहे.

मजबूत ओपनिंगनंतर निफ्टी बुधवारी एका रेंजमध्ये व्यवहार करताना दिसला आणि 17000 च्या वर राहण्यात यशस्वी झाला असे चॉईस ब्रोकिंगचे पलक कोठारी म्हणाले. ते त्याच्या 21- HMA वर देखील राहिला, जे संकेत देते की जर निफ्टी 17,000 च्या वर राहिला तर तो आणखी चढ-उतार पाहू शकतो. निफ्टीने तासाच्या चार्टवर डोजी कँडल तयार केली आहे जी खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील आणखी गोंधळ दाखवत असल्याचे ते म्हणाले.

Share Market
Short Term Stocks: मजबूत नफा हवा आहे, मग या 2 स्टॉक्सचा नक्की विचार करा
Share Market
Share MarketSakal

MACD आणि Stochastic सारखे मोमेंटम इंडिकेटर आवर्ली टाइमफ्रेमवर पॉझिटीव क्रॉसओव्हर दाखवत आहेत, जे बाउन्सबॅक अपेक्षित असल्याचे संकेत देत आहेत. निफ्टीला 16800 वर सपोर्ट आहे. त्याच वेळी, 17350 वर रझिस्टंस आहे. जर निफ्टीने या पातळीच्या वर गेलाच केले तर 17,500-17,800 ची पातळी दिसू शकते. तर बँक निफ्टीबाबत 35,300 वर सपोर्ट आणि 37,000 वर रझिस्टंस दाखवत आहे.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- इंडसइंड बँक (INDUSINDBK)

- जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

- टाटा मोटर्स (TATAMOTORS)

- ॲक्सीस बँक (AXISBANK)

- अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

- आयडिया (IDEA)

- टाटा पॉवर (TATAPOWER)

- कमिंस इंडिया (CUMMINSIND)

- झी एन्टरटेन्मेंट (ZEEL)

- एम फॅसिस (MPHASIS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com