बचत खात्यात मर्यादा ओलांडून कराल रोखीने व्यवहार तर याल IT च्या रडारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

There is also a limit on withdrawals in savings accounts

बचत खात्यात मर्यादा ओलांडून कराल रोखीने व्यवहार तर याल IT च्या रडारवर

बचत खात्यात मर्यादा ओलांडून कराल रोखीने व्यवहार तर याल IT च्या रडारवर

तुमच्या सेविंग्ज अकाउंटमध्ये (Savings Account) रोख (Cash) जमा करण्या व्यतिरिक्त, पैसे काढण्याचे नियम जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. कारण आता पैसे काढण्याचीही मर्यादा ठेवण्यात आली आहे, मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास कर (tax) विभाग कारवाई करू शकतो. त्यामुळेच तुम्हाला पैसे काढण्याशी संबंधित नियम माहित असले पाहिजेत.

प्रत्येक बचत खात्यात (Savings Account) रोख (Cash) ठेवण्याची मर्यादा आहे, जी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) निश्चित केली आहे. आज आपण बचत खात्यात जास्तीत जास्त किती रोख रक्कम जमा केली जाऊ शकते, याबद्दल जाणून घेऊयात. आता सगळेच जण कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहेत, अशातच बचत खात्यांमधील रोख व्यवहारांचे प्रमाण कमी झाले आहे.

हेही वाचा: तुमच्या नावाने Fake FB अकाउंट उघडलय? अशी करा तक्रार

रोख ठेव (Cash Deposit) मर्यादा काय आहे ?

बचत बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याची मर्यादा 1 लाख रुपये आहे. बचत खात्यात 1 लाखाहून अधिक रक्कम जमा केल्यास कर विभागाचे तुमच्या अकाऊंटकडे लक्ष जाऊ शकते. तुमच्या ठेवीचा स्त्रोत शोधला जाऊ शकतो आणि कोणतीही गडबड दिसली तर तुम्हाला नोटीस येऊ शकते.

दूसरीकडे रोख पैसे काढण्याचे नियम जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. रोख पैसे काढण्याची मर्यादा देखील ठेवण्यात आली आहे, ज्यापेक्षा जास्त पैसे काढल्यास कर विभाग कारवाई करू शकतो. तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन पैसे काढण्याशी संबंधित नियम जाणून घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: पालकांनो सावधान! मोबाईल गेम्समुळे होईल तुमचे बॅंक अकाउंट रिकामे

चालू खात्याचे (Current Account) नियम

बचत खात्याव्यतिरिक्त, रोख व्यवहाराचे इतर अनेक नियम आहेत, जे लक्षात न ठेवता आणि जास्त रोख जमा केल्यास कर लागू होऊ शकतो. चालू खात्यात (current account) रोख रक्कम जमा करण्याची मर्यादा 50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. करंट अकाऊंट फक्त व्यावसायिक उद्देशांसाठी चालवली जातात, त्यामुळे बचत खात्यापेक्षा (savings account) त्यात 50 लाख रुपयांपर्यंतची रोख रक्कम जमा करण्यावर सूट आहे. करंट अकाऊंट धारकांनी ही मर्यादा ओलांडल्यास त्यांच्यावर कर विभागाची कारवाई होऊ शकते. त्यांना नोटीस पाठवली जाऊ शकते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :rbi
loading image
go to top