Share Market: कमाईची संधी, अनेक छोट्या कंपन्या आणत आहेत IPO...

या तीन छोट्या कंपन्या स्वतःचा आयपीओ घेऊन येत आहेत.
IPO
IPOSakal

येत्या आठवड्यात तुमच्यासाठी कमाईची संधी येणार आहे कारण अनेक छोट्या कंपन्या त्यांचे आयपीओ घेऊन येणार आहेत. पब्लिक शेअरहोल्डिंग वाढवण्यासाठी या कंपन्या आयपीओ मार्केटमध्ये उतरणार आहेत. या आठवड्यात लघु आणि मध्यम उद्योग (एसएमई) कॅटेगरीमध्येही पब्लिक इश्यू लॉन्च केला जाणार आहे, त्याच कॅटेगरीमध्ये या तीन छोट्या कंपन्या स्वतःचा आयपीओ घेऊन येत आहेत. तुम्हालाही शेअर बाजारात प्रवेश करणाऱ्या नवीन कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे असतील, तर तुम्ही या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकता आणि लिस्टिंग नफ्यानुसार तुमचा नफा मिळवू शकता.

IPO
DreamFolks IPO : ड्रीमफोक्सचा आयपीओ आजपासून विक्रीसाठी खुला

कंदर्प डिजी स्मार्ट आयपीओ (Kandarp Digi Smart IPO)
ही एक आयटी कंपनी आहे आणि त्यांनी16 सप्टेंबरला 7.68 कोटी रुपयांचा आयपीओ लॉन्च केला होता, जो 20 सप्टेंबर म्हणजेच आज बंद होणार आहे. गुंतवणूकदार 30 रुपयांच्या किमतीत 3000 इक्विटी शेअर्सच्या किमान शेअरसाठी ऍप्लाय करू शकतात. आयपीओनंतर कंपनीतील प्रमोटर्सची हिस्सेदारी 69.91 टक्क्यांपर्यंत वाढेल. या कंपनीचे शेअर्स एनएसईवर लिस्ट केले जातील.

IPO
SEBI : अप्रमेय इंजिनिअरिंगचा IPO लवकरच येणार, सेबीकडे कागदपत्र सादर...

कंटेन टेक्नोलॉजीज (Containe Technologies)
ही कंपनी ऑटो कंपोनंट्स बनवते आणि या कंपनीचा आयपीओ 20 सप्टेंबर म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. कंपनी 2.48 कोटी रुपयांचा आयपीओघेऊन येत आहे. गुंतवणूकदार 15 रुपयांच्या प्राइस बँडसह किमान 8000 शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतात. या कंपनीचे शेअर्स बीएसईवर लिस्ट केले जातील.

मॅक्स एनर्जी सोल्युशन्स (Maks Energy Solutions)
ही कंपनी इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स तयार करते. कंपनीने 16 सप्टेंबर रोजी आपला आयपीओ लॉन्च केला, ज्यामध्ये तुम्ही आज अर्थात  20 सप्टेंबरपर्यंत पैसे गुंतवू शकता. कंपनीच्या आयपीओची साईज 3.792 कोटी रुपये आहे. इथे गुंतवणूक करण्यासाठी किमान 6000 शेअर्स खरेदी करावे लागतील आणि त्याची किंमत 20 रुपये ठेवण्यात आली आहे. हे शेअर्स एनएसईवर लिस्ट केले जातील.

IPO
IPO: लवकरच येतोय वैभव ज्वेलर्सचा आयपीओ, सेबीकडे अर्ज दाखल

किती आयपीओ येणार ?
बीएसईच्या आकडेवारीनुसार, या वर्षी एकूण 52 कंपन्या त्यांचा आयपीओ घेऊन येत आहेत. यामध्ये बीएसई मेन बोर्डमध्ये आणि 33 आयपीओ बीएसई एसएमई सेगमेंटमध्ये समाविष्ट आहे. गेल्या वर्षी 64 कंपन्यांनी त्यांचे आयपीओ शेअर बाजारात आणले होते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com