'हे' चार स्टॉक्स म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका ! | Stock Market Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stock to Buy

'हे' चार स्टॉक्स म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका !


शेअर बाजारात लाँग टर्मसाठी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. मार्केट तज्ज्ञ सिद्धार्थ सेदानी काही दर्जेदार स्टॉक्स घेऊन आले आहेत. सेदानींनी त्यात पीव्हीआर (PVR), क्रिसील (Crisil), गरवारे टेक फायबर्स (Garware Tech Fibers) आणि ऍफल (Affle) या चार दर्जेदार शेअर्सचा समावेश केला आहे.

येत्या 1 वर्षासाठी या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हे स्टॉक 26 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Stock market closing update : शेअर बाजार घसरणीसह बंद

या कंपन्यांचे सेक्टर लहान आहे आणि त्यामध्ये खूप कमी कंपन्या असल्याचे मार्केट एक्सपर्ट सिद्धार्थ सेदानी म्हणाले. या कंपन्यांचा बाजारातील हिस्सा अर्थात मार्केट शेअर मोठा आहे. त्यांचा रेव्हेन्यू आणि बिझनेस मॉडेल चांगला आहे. शिवाय त्यांची वाढही खूप वेगाने होत आहे. एकूणच या कंपन्यांचे मार्केट शेअरच्या बाबतीत वर्चस्व आहे.

पीव्हीआर (PVR)
टारगेट - 2200 रुपये
रिटर्न (1 वर्ष) - 13%
ऍलोकेशन - 40%

गरवारे टेक फायबर्स (Garware Technical Fibres)
टारगेट - 3776 रुपये
रिटर्न (1 वर्ष) - 16%
ऍलोकेशन 20%

हेही वाचा: Stock Market : सेन्सेक्स ५५,८१६ तर निफ्टी १६,६४२ वर बंद; दोन दिवसांनी वाढ

ऍफल (Affle)
टारगेट - 1220 रुपये
रिटर्न (1 वर्ष) - 18%
ऍलोकेशन - 20%

क्रिसिल (Crisil)
टारगेट - 4000 रुपये
रिटर्न (1 वर्ष) - 26%
ऍलोकेशन - 20%


नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: These Stocks Will Give You 100 Percent Return

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top