गर्भवती महिलांना केंद्र सरकार देणार पैसे |Government Schemes | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Government Schemes

गर्भवती महिलांना केंद्र सरकार देणार पैसे

देशभरातील महिलांसाठी सरकार अनेर योजना राबवित असते. खास करुन गरजू आणि गरीब महिलांसाठी सरकार विविध योजना आणत असतात. या सर्व योजना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी असतात. केंद्र सरकारची एक योजना सध्या चर्चेत आहे. (These Women get six thousand rupees by government scheme check the how to apply)

6 हजार रुपये मिळू शकतात.

या योजनेद्वारे महिलांना 6 हजार रुपये मिळू शकतात. केंद्र सरकारद्वारे चालविण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ फक्त महिला घेऊ शकतात. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, ज्या अंतर्गत केंद्र सरकार महिलांना 6000 रुपये देते.

ही योजना कोणासाठी आहे?

केंद्र सरकारने गर्भवती महिलांसाठी ही योजना सुरू केली आहे .या योजनेत गर्भवती महिला अर्ज करू शकतात. गर्भवती महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?

जर महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही कागदपत्रे त्यांच्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहेत.आपल्याकजे आई-वडिलांचे आधार कार्ड, पालकांचे ओळखपत्र, मुलाचे जन्म प्रमाणपत्र तसेच बँक खात्याचे पासबुक असावे.

पूर्ण पैसे तीन किस्त्यांमध्ये मिळतील

या योजनेअंतर्गत तुम्हाला ६ हजार रुपये मिळतील. हे पैसे तीन किस्त्यांमध्ये मिळू शकतात. पहिल्या टप्प्यात 1000 रुपये, दुसर्‍या टप्प्यात 2000 रुपये आणि तिसर्‍या टप्प्यात 2000 रुपये दिले जातात. त्याचवेळी, बाळाच्या जन्माच्या वेळी सरकार शेवटचे 1000 रुपये रुग्णालयाला देते.

Web Title: These Women Get Six Thousand Rupees By Government Scheme Check How To Apply

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top