या कंझ्युमर गुड्स स्टॉकचा 3 महिन्यांत 40% परतावा, आता देणार 5 रुपये फायनल डिव्हिडेंड

आता ही कंपनी 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या 50 टक्के म्हणजेच प्रति शेअर 5 रुपये फायनल डिव्हिडेंड देणार आहे.
stock
stock google

मुंबई : डिस्क्रेशनरी गुड्स अँड सर्व्हिसेस (CDGS) उद्योगाशी संबंधित असलेल्या स्मॉल-कॅप कंपनीच्या ट्रायटन वाल्व्हज (Triton Valves) स्टॉकने गेल्या तीन महिन्यांत जवळपास 40 टक्के परतावा दिला आहे.

आता ही कंपनी 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या 50 टक्के म्हणजेच प्रति शेअर 5 रुपये फायनल डिव्हिडेंड देणार आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांत त्यांनी 23 टक्के परतावा दिला आहे. आजही ट्रायटन वाल्व्हजच्या (Triton Valves) शेअरमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे.

टायर वाल्व्हचा मोठा मॅन्युफॅक्चरर

ट्रायटन वाल्व्हस लिमिटेड ही 158.86 कोटी रुपयांच्या मार्केट व्हॅल्यूची स्मॉलकॅप कंपनी आहे, जी सीडीजीएस उद्योगाच्या व्यवसायात आहे. ट्रायटन ही भारतातील टायर व्हॉल्व्हची सर्वात मोठी उत्पादक आहे आणि हायड्रोलिक्स, खाणकाम, एअरोस्पेस आणि इंडस्ट्रियल एचवीएसीसह ग्राहकांना आणि क्षेत्रांची सेवा देते. कंपनीचे हेडक्वार्टर बंगलोरमध्ये आहे, तर आर अँड डी सेंटर आणि प्रॉडक्शन फॅसिलिटीज म्हैसूर इथे आहेत.

5 रुपये डिव्हिडेंड

कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये फेस व्हॅल्यूनुसार प्रति इक्विटी शेअर 50 टक्के म्हणजे 5 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या डिव्हिडेंडची शिफारस केल्याचे कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे. मात्र, त्यासाठी कंपनीच्या एजीएममध्ये मंजुरी घ्यावी लागणार आहे.

रेकॉर्ड डेट

शेयरहोल्डर्सची एलिजिबिलिटी निश्चित करण्याससाठी 23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2022 पर्यंत कंपनीचे रजिस्टर ऑफ मेंबर्स आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बंद असतील असे कंपनीच्या संचालक मंडळाने जाहीर केले आहे. कंपनीने फायनल डिव्हिडेंडसाठी 22 सप्टेंबर 2022 ही तारीख निश्चित केली आहे. फायनल डिव्हिडेंड मंजूर झाल्यास, डिव्हिडेंड एजीएमच्या तारखेपासून 30 महिन्यांच्या आत ट्रान्सफर केला जाईल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com