
SBIची 'ही' सेवा आज रात्री 7 तासांसाठी बंद असेल, महत्वाची कामे आत्ताच करा
तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 26 आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी बँकेचे तक्रार सेवा पोर्टल (Complaint Service Portal) काही तासांसाठी उपलब्ध होणार नाही. SBI आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळोवेळी आपले पोर्टल अपडेट होत असते.
बँकेची ट्विटरवरून माहिती
आम्ही आमच्या ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी आमच्यासोबत राहावे कारण आम्ही अधिक चांगला बँकिंग अनुभव देण्याचा प्रयत्न करतो असे एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटरवर हँडलवर म्हटले आहे. (This service of SBI will be closed for 7 hours tonight, do important work now)
बँकेचे तक्रार पोर्टल http://crcf.sbi.co.in 26 फेब्रुवारीच्या रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार नाही. या काळात ग्राहक कोणत्याही प्रकारची तक्रार, चौकशी इत्यादींसाठी बँकेच्या टोल फ्री क्रमांक 1800112211/18001234/18002100 वर संपर्क साधू शकतात.
उत्तम बँकिंगसाठी मेन्टेनंस
चांगल्या बँकिंग अनुभवासाठी SBI वेळोवेळी मेन्टेनंस करत असते. ऑनलाइन बँकिंग आजकाल सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. कोरोनामुळे लोक डिजिटली बँकेचे अकाउंट हँडल करतात. अशात ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल एसबीआयने दिलगिरी व्यक्त केली आहे आणि ग्राहकांचा बँकिंग अनुभव सुधारण्यासाठी बँक मेन्टेनंस करत असल्याचेही म्हटले आहे.
Web Title: This Service Of Sbi Will Be Closed For 7 Hours Tonight Do Important Work Now
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..