वॉरेन बफेंकडून 30 हजार कोटींचे दान; म्हणाले आतापर्यंत फक्त अर्धी संपत्ती दिली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वॉरेन बफेंकडून 30 हजार कोटींचे दान; म्हणाले आतापर्यंत फक्त अर्धी संपत्ती दिली

वॉरेन बफेंकडून 30 हजार कोटींचे दान; म्हणाले आतापर्यंत फक्त अर्धी संपत्ती दिली

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक असलेले आणि दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे (waren bafe) यांनी बिल अँड मेलिंडा गेट्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच आपल्या पदाचा राजीनामा देताना त्यांनी ट्रस्टला तब्बल 30 हजार कोटी रुपये किंमतीचे बर्कशायर हॅथवेचे शेअर्स (berkshire hathaway shares) दान करण्याची घोषणा केली. बफे यांनी गेल्या वर्षी सुद्धा जवळपास 15 हजार कोटी किंमतीचे शेअर्स गेट्स फाउंडेशला (get foundation) दान दिले होते. बफे यांनी 2006 मध्ये अशी घोषणा केली होती की, आपल्या मृत्यूच्या आधी संपत्तीपैकी 99 टक्के भाग हा दान करेन.

वॉरेन बफे यांनी 30 हजार कोटी रुपये दान केले आहेत. त्यानंतर बफेट म्हणाले की, मी संपत्ती दान करण्याचं जितंक ध्येय ठेवलं आहे त्यातलं अर्धा टप्पा गाठला आहे. सध्या 90 वर्षांचे असलेल्या बफे यांनी 2006 मध्ये स्वत:च्या मालकीची 99 टक्के संपत्ती दान करणार असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून बफेट हे दरवर्षी पाच चॅरिटेबल ट्रस्टला मोठी रक्कम दान करतात. गेट्स फाउंडेशनमधून बफे बाहेर पडले असले तरी त्यांनी यामागचं कारण सांगितलेलं नाही. सध्याचे सीईओ आणि त्यांच्या कामाचं बफे यांनी कौतुक केलं आहे.

हेही वाचा: बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करा- सुप्रीम कोर्ट

जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये समावेश असलेल्या मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स हे नुकतेच विभक्त झाले. मात्र तरीही आपण मिळून गेट्स फाउंडेशनचं काम पुढे सुरुच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. या फाउंडेशनच्या माध्यमातून जगभरात आरोग्य क्षेत्रात काम केलं जातं. गेल्या दोन दशकात फाउंडेशनने जवळपास 50 अब्ज डॉलर्सहून जास्त रक्कम ही गरीबी आणि आजार दूर करण्यासाठी खर्च केली आहे.

टॅग्स :economic news