Tips and tricks to get business loan from banks Finance news Marathi
Tips and tricks to get business loan from banks Finance news Marathi

ऐका हो ऐका! नवीन व्यवसाय सुरू करायचाय पण लोन घेण्याबाबत संभ्रमात आहात? मग ही बातमी नक्की वाचा

नागपूर : भारतात तब्बल ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक तरुण आहेत असं म्हणतात. मात्र जितके जास्त तरुण तितकी जास्त रोजगाराची गरज. भारतात रोजगाराविषयीचं वास्तव आता नव्यानं सांगायची गरज नाही. म्हणून अनेकजण स्वतःच्या व्यवसायाकडे वळत आहेत. मात्र स्वतः`चा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भांडवल. महागाईच्या या काळात व्यवसायासाठी भांडवल मिळवणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखं आहे. म्हणूनच अनेकजण भांडवलासाठी बँकांकडे धाव घेतात. प्रत्येकाला लोन मिळतच असं नाही. पण जर तुम्हाला लोन मिळवण्यासाठी अडचणी येत असतील तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. पूर्ण नक्की वाचा. 

लोनसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता : 

  • उद्योगाची वार्षिक उलाढाल रु १५ लाख ते रु १ कोटी यामध्ये असली पाहिजे.
  • अर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे व लोनचा अवधी संपेल त्या दिवशी ६५ पेक्षा अधिक नसावे.
  • व्यवसाय किमान ३ वर्षापासून सुरू असावा, मात्र, काही लोन देणार्‍या कंपन्या मागील १ वर्षापासून कार्यरत असलेल्या उद्योगांना पण लोन देतात.
  • अजून एक महत्वाचा निकष असतो अर्जदाराचा क्रेडिट स्कोर/सिबिल स्कोर. कर्जदाराची परतफेड करण्याची प्रवृत्ती आणि त्याला लोनची परतफेड करता येईल का हे तपासण्यासाठी क्रेडिट स्कोर पाहिले जाते. चांगला क्रेडिट स्कोर असल्यास लोनचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.
  • लोनची रक्कम, उद्देश, कंपनीचा प्रकार इ. पण काही निकष असतात.
  • लोन देणारी कंपनी साधारणपणे पुढील कागदपत्रे सादर करायला सांगते: पॅन कार्ड, आधार कार्ड, पीडीएफ रूपात मागील १२ महिन्यांची बँक स्टेटमेंट, मागील २ वर्षांचे आयटी रिटर्न, दुकान व आस्थापना परवाना, जीएसटी पावत्या इ.

लोन घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

क्रेडिट स्टेटस माहिती 

  • वेळोवेळी तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासून पाहणे अत्यंत महत्वाचे असते. लोन देणारी प्रत्येक कंपनी तुमचा क्रेडिट स्कोर आणि हिस्टरी तपासून पाहते. भूतकाळात तुम्ही किती लोन घेतले होते, त्यांची वेळेवर परतफेड केली का, तुम्ही काही फसवणूक करणारे काम केले आहे का आणि क्रेडिट कार्ड कसा वापरता याबाबत माहिती गोळा करण्यासाठी हे केले जाते.
  • म्हणून तुमची पेमेंट हिस्टरी, इतरांना किती पैसे द्यायचे आहे, आणि किती प्रकारचे कर्ज तुम्ही घेतले आहे ही माहिती असली पाहिजे.
  • ७५० – ९०० यामध्ये अर्जदाराचा क्रेडिट स्कोर असल्यास तो चांगला समजला जातो, पण हे लोन देणाऱ्या कंपनी वर अवलंबून असते. काही लोन देणार्‍या कंपन्यांची क्रेडिट स्कोर परिगणित करण्याची स्वतःची पद्धत असते.

उद्योगाच्या नेमक्या गरजांचे विश्लेषण 

लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्या उद्योगाच्या गरजांचे विश्लेषण करणे आवश्यक असते. उद्योगासाठी नेमके काय हवे आहे, उद्योगाचा विस्तार करायचा आहे  किंवा नवीन मशीन विकत घ्यायची आहे किंवा उद्योगाच्या रोजच्या कार्यासाठी पैसे हवे आहेत हे ठरवा. तुम्हाला लोन नेमके कशासाठी हवे आहे याबाबत स्पष्टता असावी आणि लोन देणाऱ्या कंपनीला ते पटवून देता आले पाहिजे.

लोन देणाऱ्या कंपनीबाबत माहिती गोळा करा

  • तुमचा अर्ज नामंजूर होऊ नये याची खात्री करण्यासाठी लोन देणारी कंपनी, कंपनी कोणत्या प्रकारचे लोन देते, किती व्याज दर आकारते, आणि इतर अटी व शर्ती बाबत माहिती गोळा करणे महत्वाचे असते. असे केल्याने तुमचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.
  • तुम्ही कोणत्या लोन देणाऱ्या संस्थेला निवडता यावर लोन देणाऱ्या संस्थेला संपर्क कसा करायचा हे अवलंबून असते.
  • तुम्ही लोनसाठी बँकेत अर्ज करत असाल तर तुम्हाला बँक मॅनेजरच्या नावाने पत्र लिहावे लागते  ज्यात तुम्हाला कोणत्या कारणासाठी आणि किती लोन हवे आहे हे नमूद करावे लागेल.
  • पत्रात तुमच्या उद्योगाचे नाव, रचना, थोडक्यात माहिती, किती वर्षांपासून उद्योग कार्यरत आहे, त्यात किती कर्मचारी काम करतात, आणि त्या वर्षी किती उत्पन्न झाले हे सर्व नमूद करावे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 

  • लोन देणाऱ्या कंपनीच्या वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • लोन मंजूर होण्याची वाट पहा.
  • लोन मंजूर झाल्यास काही दिवसात लोनची रक्कम दिली जाईल. 

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com