मंगळवारी बाजार उच्चांकी पातळीवर पोचणार?

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

नवी दिल्ली: पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये जाहीर झाले आहेत. यात उत्तर प्रदेशात भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तसेच उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये देखील भाजपला जनतेने कौल दिला आहे. भाजपला मिळालेल्या विजयामुळे बाजार विश्लेषकांच्या मते मंगळवारी भारतीय शेअर बाजार सकारात्मक राहण्याची शक्यता आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी नवीन उच्चांकी पातळी गाठण्याची शक्यता आहे. आज (सोमवार) होळीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.

शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये किरकोळ 17 अंशांची वाढ होऊन तो 28 हजार 946 अंशांवर बंद झाला. मागील सत्रात निर्देशांकात 27 अंशांची वाढ झाली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 7 अंशांची वाढ होऊन तो 8 हजार 934 अंशांवर बंद झाला. सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्‍समध्ये 113 अंश म्हणजेच 0.39 टक्के आणि निफ्टीत 37 अंश म्हणजेच 0.41 टक्के वाढ झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today market up now