Share Market Closing : सेन्सेक्स 114 अंकांच्या वाढीसह 60,950 वर बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Share Market Update

Share Market Closing : सेन्सेक्स 114 अंकांच्या वाढीसह 60,950 वर बंद

Share Market Closing : आज भारतीय शेअर बाजार अतिशय अस्थिर होता. दोन्ही प्रमुख निर्देशांक दिवसभर चढ-उतार करताना दिसले. निफ्टी काल जिथे बंद झाला तिथेच उघडला आणि नंतर घसरण सुरू झाली. पण आज निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. त्याचप्रमाणे सेन्सेक्स सकाळी घसरणीसह उघडला, पण बाजार बंद होईपर्यंत त्यात तेजी दिसून आली.

हेही वाचा : भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

जागतिक संकेतांमुळे आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजार घसरणीसह उघडला. सेन्सेक्स 138 अंकांच्या घसरणीसह 60,698 वर उघडला, तर निफ्टी 18,053 वर आहे. बँक निफ्टीमध्ये 16 अंकांची किंचित वाढ होऊन तो 41,314 च्या पातळीवर उघडला. घसरणीसह उघडल्यानंतर बाजारात किंचित सुधारणा दिसून येत आहे. टाटा स्टील, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स वधारत आहेत. इन्फोसिस, डॉ. रेड्डी, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि सन फार्मा यांसारखे शेअर्स घसरले आहेत.

हेही वाचा: Income Tax Return : आता येणार एक राष्ट्र एक आयटीआर फॉर्म?

असा अंदाज आहे की, यूएस फेडने व्याजदरात वाढ केल्यानंतर आता जवळजवळ प्रत्येक देशाची मध्यवर्ती बँक त्याचे पालन करू शकते. अशा स्थितीत जगभरातील बाजारपेठांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) गेल्या 10 सत्रांमध्ये सतत पैसे गुंतवत असल्यामुळे भारतीय बाजार आज घसरणीवरून तेजीत आला आहे.