
बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते १० शेअर्स दाखवतील चमक ?
मुंबई : एक दिवसाच्या रिकव्हरीनंतर शुक्रवारी बाजारात पुन्ही घसरणा पाहायला मिळाली. या तीव्र घसरणीने निफ्टीमधील पुलबॅकची आशा संपली. इंडेक्सने डेली आणि विकली चार्टवर बियरीश कँडल तयार केली आहे. जी घसरणीचे संकेत देते आहे. निफ्टी 50 जवळपास 200 अंकांच्या घसरणीसह 16,284 वर उघडला आणि दिवसभरात तो 16,173 इंट्राडेवर पोहोचला.
16,325 हा दिवसाचा उच्चांक पुढील सत्रात रझिस्टंस म्हणून काम करू शकतो असे तज्ज्ञांनी सांगितले. इंडेक्स 276 अंकांनी म्हणजेच 1.68 टक्क्यांनी घसरून 16,202 वर बंद झाला.
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी निफ्टी घसरणीसह बंद झाल्याने पुलबॅकची आशा संपल्याचे चार्टव्यू इंडियाचे चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट मजहर मोहम्मद म्हणाले. तसेच एक बियरीश कँडल गेल्या आठवड्याच्या फॉर्मेशननुसार खाली उतरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
निफ्टी आता 15,900 ते 15,735 ची पातळी खाली बघू शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी वरच्या दिशेने गेला तर तो 16324 वर थांबू शकतो. या वर साइडवे कंसोलिडेशन दिसेल. सध्या तरी इंडेक्सच्या ट्रेडमध्ये न्यूट्रल राहणे योग्य राहिल असे त्यांनी स्पष्ट केले.
तर बँक निफ्टी 400 हून अधिक अंकांनी घसरला. त्यानंतर तो 34,347 च्या पातळीवर गेला. शुक्रवारी तो बराच काळ नेगिटीव्ह राहिला आणि दिवसाचा शेवट 602 अंकांनी घसरून 34,484 वर झाला. बँकिंग इंडेक्सने डेली आणि विकली स्केलवर बियरीश कँडल तयार केली आहे आणि तो 34,750 चे महत्त्वाच्या सपोर्ट खाली बंद झाल्याे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चंदन तापडिया यांनी सांगितले.
जोपर्यंत बँक निफ्टी 34,750 च्या खाली व्यवहार करत राहील, तोपर्यंत त्यात आणखी कमजोरी दिसून येईल. तो यापुढे 34,250 आणि 34,000 च्या पातळीवर घसरू शकतो असेही ते म्हणाले.
आजचे टॉप १० शेअर्स कोणते ?
ग्रासिम (GRASSIM)
अपोलो हॉस्पिटल (APPOLOHOSP)
एशियन पेन्ट्स (ASIANPAIN)
डिवीस लॅब (DIVISLAB)
डॉ. रेड्डी (DRREDDY)
बजाज फायनान्स (BAJAJFIN)
कोटक बँक (KOTAKBANK)
एचडीएफसी (HDFC)
हिन्दाल्को (HINDALCO)
रिलायन्स (RELIANCE)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Todays List Of Top 10 Shares
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..