esakal | जगातील टॉप 10 श्रीमंत लोकांमध्ये एकट्या अमेरिकेचे 8 जण; पाहा यादी
sakal

बोलून बातमी शोधा

TOP 10 RICH PERSON IN THE WORLD

ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या यादीनुसार जगभरातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे प्रथम क्रमांकवर आहेत.

जगातील टॉप 10 श्रीमंत लोकांमध्ये एकट्या अमेरिकेचे 8 जण; पाहा यादी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

वॉशिंग्टन: bloomberg billionaires index top 10- ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या यादीनुसार जगभरातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे प्रथम क्रमांकवर आहेत. तर भारतातील रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुकेश अंबानी 75.5 अब्ज डॉलरसह दहाव्या क्रमांकावर आहेत. तसेच या यादीत माइक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, टेस्ला व स्पेस एक्सचे एलन मस्क, फेसबुकचे मार्क जुकरबर्ग यांचा समावेश आहे.

क्रमांक श्रीमंत व्यक्ती कंपनी संपत्ती (अब्ज डॉलर)
1 जेफ बेझोज अमेझॉन 185 
2 बिल गेट्स माइक्रोसॉफ्ट 129
3 एलन मस्क टेस्ला व स्पेस एक्स 110
4 मार्क जुकरबर्ग फेसबूक 104
5 बर्नार्ड अर्नाल्ट एलवीएमएच 102
6 वॉरेन बफेट बर्कशायर हॅथवे 88
7 लॅरी पेज गूगल 82.7
8 सर्जी ब्रिन गूगल 80
9 स्टीव बॉलमर माइक्रोसॉफ्ट 77.5
10 RIL मुकेश अंबानी 75.5

10 पैकी 8 जण अमेरिकेचे-
bloomberg billionaires index top 10 यादीत अमेरिकेच्या 8 व्यक्तींचा समावेश आहे. या यादीत बर्नार्ड अर्नाल्ट आणि मुकेश अंबानी हे दोघजण अनुक्रमे फ्रान्स आणि भारतातील आहेत. मागील काही दिवसांत मुकेश अंबांनी यांचीही संपत्ती कमी झाल्याचे दिसले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

spaceX आणि Teslaचे प्रमुख एलन मस्क आता जगातील तिसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मस्क यांची एकूण संपत्ती 110 अब्ज डॉलर झाली आहे. मागील काही वर्षांपासून एलन मस्क बऱ्याच कारणांनी सातत्याने चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपुर्वी मस्क यांना कोरोनाची लागणही झाली होती. अलीकडेच मस्क यांच्या रॉकेट कंपनीने चार ऍस्ट्रॉनटला अवकाशात पाठवले आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image