esakal | ‘ट्रेड विथ स्टॉपलॉस’
sakal

बोलून बातमी शोधा

Bata

गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ४४,१४९ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १२,९६८ अंशांवर बंद झाला. जीडीपी दुसऱ्या तिमाहीतील उणे (-२३.९) टक्क्यांवरून उणे (-७.५) टक्के नोंदविले गेल्याने अर्थव्यवस्था सावरत असल्याचे चित्र आहे.  शेअर बाजाराने लॉकडाउनमधील पडझडीनंतर इंग्रजी अक्षर ‘व्ही’ (v)सारखी ताबडतोब तेजी दर्शवीत नवा उच्चांक गाठला. आता ‘सेन्सेक्स’ची ३९,२४० अंश ही महत्त्वाची आधार पातळी आहे.

‘ट्रेड विथ स्टॉपलॉस’

sakal_logo
By
भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ४४,१४९ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १२,९६८ अंशांवर बंद झाला. जीडीपी दुसऱ्या तिमाहीतील उणे (-२३.९) टक्क्यांवरून उणे (-७.५) टक्के नोंदविले गेल्याने अर्थव्यवस्था सावरत असल्याचे चित्र आहे.  शेअर बाजाराने लॉकडाउनमधील पडझडीनंतर इंग्रजी अक्षर ‘व्ही’ (v)सारखी ताबडतोब तेजी दर्शवीत नवा उच्चांक गाठला. आता ‘सेन्सेक्स’ची ३९,२४० अंश ही महत्त्वाची आधार पातळी आहे. ट्रेडिंगसाठी विचार करता आलेखानुसार, वरुण ब्रेव्हरेज, बाटा इंडिया, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स आदी कंपन्यांच्या शेअरचे आलेख तेजीचा कल दर्शवीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘बाटा’चे तेजीचे संकेत
बाटा इंडिया लि. ही चप्पल, बूटनिर्मिती क्षेत्रातील नामवंत कंपनी आहे. एकूण कर्ज आणि भांडवलाचा विचार करता ‘बाटा’कडे भांडवलाचे प्रमाण जास्त आहे. लॉकडाउननंतरच्या काळात बाटा कंपनी पुन्हा हळूहळू व्यवसायात रुळावर येणे अपेक्षित आहे. फेब्रुवारीपासून मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणात पडझड दर्शविल्यानंतर या कंपनीच्या शेअरने जूनपासून रु. १४६४ ते १२१३ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविला होता. मात्र, नोव्हेंबरमध्ये रु. १४६४ या अडथळा पातळीच्या वर रु.१५७२ ला बंदभाव देऊन या शेअरने मर्यादित पातळ्यांमध्ये अडकलेल्या बंदिस्त अवस्थेमधून बाहेर पडल्याचे संकेत दिले. मध्यम अवधीच्या आलेखानुसार, ‘बाटा’चा शेअरभाव रु. १२९३ या ‘स्टॉपलॉस’ पातळीच्या वर आहे, तोपर्यंत आणखी वाढ दर्शविणे अपेक्षित आहे. 

तेजीच्या आलेखावर लक्ष ठेवा
आगामी आठवड्यात निर्देशांकाने तसेच तेजीचा कल दर्शविणाऱ्या शेअरनेदेखील तेजीचे संकेत दिल्यास टेक्नो-फंडामेंटल्सनुसार आकलन करून मर्यादित धोका स्वीकारून ‘स्टॉपलॉस’ तंत्राचा वापर करावा. संयम ठेवून मर्यादित भांडवल गुंतविणे योग्य ठरू शकेल. 

वरील लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार.)

Edited By - Prashant Patil

loading image