Delhi Acid Attack : फ्लिपकार्टविरोधात व्यापारी संघटना आक्रमक; पुढील सात दिवसांत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Flipkart

Delhi Acid Attack : फ्लिपकार्टविरोधात व्यापारी संघटना आक्रमक; पुढील सात दिवसांत...

द्वारका येथील १७ वर्षीय विद्यार्थीनीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यामुळे दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. या घटनेतील मुख्य आरोपींसह ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी सचिन आरोरा असून, त्याच्यासोबत हर्षित अग्रवाल आणि वीरेंद्र सिंह हे दोघे आरोपी सोबत होते.

आरोपींनी फ्लिपकार्टवरून ऑनलाइन अ‍ॅसिड मागवले होते. या हल्ल्यात विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फेडरेशनने (CAIT) फ्लिपकार्टविरोधात मोर्चा काढला आहे. दिल्लीतील द्वारका येथे एका मुलीवर अॅसिड हल्ला करण्यात आला हे अॅसिड फ्लिपकार्टवरूनच विकत घेण्यात आले. तेव्हापासून, विविध स्वयंसेवी संस्था ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म विरोधात आक्रमक झाल्या आहेत.

सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना या प्रकरणाची दखल घेऊन फ्लिपकार्टवर त्वरीत कायदेशीर कारवाई सुरू करण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, फ्लिपकार्टद्वारे अॅसिडची विक्री करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

हेही वाचा: Pune Municipal : महापालिकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून त्रास

सीएआयटीचे अध्यक्ष बी.सी. भरतिया यांनी म्हटले आहे की, जर एखाद्या लहान दुकानदाराकडून असे कृत्य घडले असते तर पोलिसांनी आतापर्यंत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असता. पण, Amazon आणि Flipkart सारख्या मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या कायदा मोडत आहेत आणि त्यातून सुटत आहेत. सरकारला ई-कॉमर्स कंपन्यांसाठी कडक नियम करावे लागतील.

या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) फ्लिपकार्टकडून स्पष्टीकरणही मागवले आहे. फ्लिपकार्टला पुढील सात दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी, दिल्ली महिला आयोगाने दोन ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून ऍसिड विक्रीला परवानगी दिल्याबद्दल नोटीस बजावली होती.