esakal | सेन्सेक्स, निफ्टीमध्ये 10 टक्क्यांची घसरण, पुन्हा लागले लोअर सर्किट
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

सर्किट ब्रेकर म्हणजे काय?
एखाद्या शेअरची एका दिवसात होणारी हालचाल, तेजी किंवा घसरण मर्यदित ठेवण्यासाठी जे प्रमाण निश्चित केले आहे त्याला सर्किट ब्रेकर असे म्हणतात. म्हणजे तेजीला वेसण घालण्यासाठी 'अप्पर' सर्किट तर घसरणीला मर्यादित ठेवण्यासाठी 'लोअर' सर्किट.

सेन्सेक्स, निफ्टीमध्ये 10 टक्क्यांची घसरण, पुन्हा लागले लोअर सर्किट

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभर 'कोरोना'ने थैमान घातले असून, भारतीय शेअर बाजारात त्याचे मोठे पडसाद उमटले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये मोठी पडझड झाली आहे.

बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 2800 अंशांची म्हणजे 9.37 टक्क्यांची घसरण झाली. मात्र त्यानंतर बाजारात आणखी घसरण वाढली आणि 2991 अंशांची घसरण झाली आणि सेन्सेक्स 26 हजार 924 अंशांवर पोचला.. निफ्टीमध्ये देखील 800 अंशांची घसरण झाली आणि 8 हजार अंशांच्या खाली पोचला. दोन्ही निर्देशांकांमध्ये 10 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याने बाजाराला लोअर सर्किट लागले आणि बाजाराचे कामकाज 45 मिनिटांसाठी थांबविण्यात आले. चालू महिन्यात सलग दुसऱ्यांदा लोअर सर्किट लागले आहे.

सर्किट ब्रेकर म्हणजे काय?
एखाद्या शेअरची एका दिवसात होणारी हालचाल, तेजी किंवा घसरण मर्यदित ठेवण्यासाठी जे प्रमाण निश्चित केले आहे त्याला सर्किट ब्रेकर असे म्हणतात. म्हणजे तेजीला वेसण घालण्यासाठी 'अप्पर' सर्किट तर घसरणीला मर्यादित ठेवण्यासाठी 'लोअर' सर्किट.

सर्किट लिमिट फॉर स्टॉक एक्सचेंजेस
सर्वसाधारण शेअरप्रमाणेच सेन्सेक्स किंवा निफ्टी सारख्या निर्देशांकांना देखील सर्किट लिमिट असते. मात्र त्याचे प्रमाण आणि लिमिट कालावधी वेगळा असतो. निर्देशांकांना 10, 15 आणि 20 टक्के याप्रमाणे सर्किट लागते. म्हणजे एखाद्या दिवशी या निर्देशांकांमध्ये 10, 15 आणि 20 टक्क्यांच्या प्रमाणात तेजी किंवा घसरण झाली तर निर्देशांकाचे कामकाज विशिष्ट कालावधीसाठी थांबविले जाते. उदा.

10 टक्के : निर्देशांकात दुपारी  1 किंवा  1 ते  2.30 वाजेपर्यंत 10 टक्क्यांची तेजी किंवा घसरण झाल्यास  1 तासांसाठी कामकाज थांबविले जाते.

15 टक्के  : निर्देशांकात दुपारी 1 वाजेपर्यंत 15 टक्क्यांची तेजी किंवा घसरण झाल्यास 2 तासांसाठी कामकाज थांबविले जाते.

1 ते  2 वाजेपर्यंत तेजी किंवा घसरण झाल्यास  1 तासांसाठी कामकाज थांबविले जाते.

2.30 नंतर तेजी किंवा घसरण झाल्यास दिवसभरासाठी कामकाज थांबविले जाते.
20 टक्के : निर्देशांकात 20 टक्क्यांची तेजी किंवा घसरण झाल्यास संपूर्ण दिवसभरासाठी कामकाज थांबविले जाते.