डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'इंडिया इज टेरिफ किंग' 

वृत्तसंस्था
Monday, 29 April 2019

भारत हा 'टेरिफ किंग' असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे

वॉशिंग्टन: अमेरिकेतून भारतात आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात आयात कर आकाराला जातो याबद्दल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली आहे. भारत हा 'टेरिफ किंग' असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेतून येणाऱ्या हार्ले डेव्हिडसन तसेच पेपर वस्तूंवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क आकारत असल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर सडकून टीका केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयातशुल्क आकारणे योग्य नसल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. विस्कॉन्सिन येथील रिपब्लिकन पक्षाच्या सभेवेळी ते बोलत होते. 

या अगोदरच भारतने हार्ले डेव्हिडसन या प्रसिद्ध अमेरिकन मोटरसायकलवरील आयातशुल्क 100 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर आणले आहे. याबद्दल ट्रम्प यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र आयातशुल्कात आणखी घट झाली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trump Again Goes After India on Trade, Says it Slaps 'Big Tariffs' on American Products