टोयोटा किर्लोस्कर मोटरचा पुण्यामध्ये विस्तार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

पुणे - टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) पुण्यात आपला विस्तार करीत पिनॅकल स्क्वेअर, चांदणी चौक, बावधन येथे नवीन डीलरशिप सुरू केली आहे. ‘के. कोठारी टोयोटा’ ही टोयोटाची पुण्यातील तिसरी डीलरशिप असून, महाराष्ट्रातील ४१ वा टच पॉइंट आहे. याचे उद्‌घाटन ‘टोयोटा किर्लोस्कर मोटर’चे उपव्यवस्थापकीय संचालक एन. राजा यांच्या हस्ते व के. कोठारी टोयोटाचे डीलर प्रिन्सिपल आशिष कोठारी यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी बोलताना आशिष कोठारी म्हणाले, ‘‘पुण्यातील ग्राहकांना जागतिक दर्जाच्या खरेदी व ओनरशिप अनुभव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.’’ नवीन डीलरशिपमध्ये टोयोटाचा भारतातील अखंड संच प्रदर्शित केला जाईल.

पुणे - टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) पुण्यात आपला विस्तार करीत पिनॅकल स्क्वेअर, चांदणी चौक, बावधन येथे नवीन डीलरशिप सुरू केली आहे. ‘के. कोठारी टोयोटा’ ही टोयोटाची पुण्यातील तिसरी डीलरशिप असून, महाराष्ट्रातील ४१ वा टच पॉइंट आहे. याचे उद्‌घाटन ‘टोयोटा किर्लोस्कर मोटर’चे उपव्यवस्थापकीय संचालक एन. राजा यांच्या हस्ते व के. कोठारी टोयोटाचे डीलर प्रिन्सिपल आशिष कोठारी यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी बोलताना आशिष कोठारी म्हणाले, ‘‘पुण्यातील ग्राहकांना जागतिक दर्जाच्या खरेदी व ओनरशिप अनुभव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.’’ नवीन डीलरशिपमध्ये टोयोटाचा भारतातील अखंड संच प्रदर्शित केला जाईल. या ठिकाणी एक्‍स्प्रेस मेंटेनन्स, बॉडी अँड पेंट रिपेअर व इतर मूल्यवर्धित सेवा देण्यात येणार आहेत. टोयोटा किर्लोस्कर मोटरकडे या डीलशिपसह आता देशभरात ३६० हून अधिक टच पॉइंट्‌स आहेत. ग्राहकांसाठी बावधनमधील मोकाई वस्ती येथे जागतिक दर्जाच्या १एस (विक्री) व २ एस (विक्री व सर्व्हिस पार्टस) सुविधाही उपलब्ध आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ttoyota kirloskar motor