टीव्हीएस कंपनीची "रेडिऑन' बाजारात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

होसूर:  टीव्हीएस मोटार कंपनीने 110 सीसीची क्षमता असलेली "टीव्हीएस रेडिऑन' ही दुचाकी बाजारात आणली आहे. मजबूत मेटल बॉडी, लांब सीट, आकर्षक लायटिंग, क्रोम स्पीडोमीटर, मेटल सायलनसर आणि आरामदायी असलेली ही दुचाकी ग्रामीण भागासह युवकांना डोळ्यांसमोर ठेवून तयार केली आहे. यामध्ये 21 नवीन फीचर्सचा समावेश केला आहे. प्रतिलिटर सरासरी 69.6 किलोमीटर मायलेज ही दुचाकी देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या दुचाकीची दिल्लीतील एक्‍स शो रूम किंमत 38 हजार 400 रुपये असून, ती चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. या गाडीला यूएसबी चार्जरची सुविधा असून 10 लिटर क्षमतेची पेट्रोलची टाकी आहे.

होसूर:  टीव्हीएस मोटार कंपनीने 110 सीसीची क्षमता असलेली "टीव्हीएस रेडिऑन' ही दुचाकी बाजारात आणली आहे. मजबूत मेटल बॉडी, लांब सीट, आकर्षक लायटिंग, क्रोम स्पीडोमीटर, मेटल सायलनसर आणि आरामदायी असलेली ही दुचाकी ग्रामीण भागासह युवकांना डोळ्यांसमोर ठेवून तयार केली आहे. यामध्ये 21 नवीन फीचर्सचा समावेश केला आहे. प्रतिलिटर सरासरी 69.6 किलोमीटर मायलेज ही दुचाकी देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या दुचाकीची दिल्लीतील एक्‍स शो रूम किंमत 38 हजार 400 रुपये असून, ती चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. या गाडीला यूएसबी चार्जरची सुविधा असून 10 लिटर क्षमतेची पेट्रोलची टाकी आहे. एक वर्षामध्ये दोन लाख दुचाकी विकण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या दुचाकीच्या डिझाईन व लूकसाठी चार वर्षे संशोधन केले असल्याची माहिती कंपनीचे उपाध्यक्ष (मार्केटिंग) अनिरुद्ध हल्दर यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TVS Radeon launched