esakal | Good News: देशातील दोन मोठ्या बॅंकांची व्याजदरात कपात; होम लोन, ऑटो लोनही स्वस्त
sakal

बोलून बातमी शोधा

home loans

हे नवीन नियम बॅंक 1 नोव्हेंबरपासून लागू करणार आहे.   

Good News: देशातील दोन मोठ्या बॅंकांची व्याजदरात कपात; होम लोन, ऑटो लोनही स्वस्त

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: मागील 9 महिन्यांपासून कोरोनाच्या प्रभावामुळे देशाची अर्थव्यवस्था मोठी बिकट झाली होती. अशात आता अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बऱ्याच बॅंका व्याज दर कमी करत आहेत. सरकारही याच्यासाठी उपाययोजना करत आहे. भारतातील बॅंक ऑफ बडोदा जी सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बॅंक आहे तिने रेपो दरावर आधारित कर्जावरील व्याजदारातील (Baroda Repo Linked Lending Rate) 0.15 टक्क्यांची कपात शनिवारी जाहीर केली आहे. यामुळेच आता गृहकर्जांसाठी असणारं व्याज दर 6.85 टक्के राहणार आहे. हे नवीन नियम बॅंक 1 नोव्हेंबरपासून लागू करत आहे.   

गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि वैयक्तिक कर्जे घेणाऱ्यांना होईल फायदा-
पुढील काही दिवस सणांचे असल्याने गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि वैयक्तिक कर्जे घेणाऱ्या ग्राहकांना बॅंकेच्या या निर्णयाचा मोठा फायदा होईल, असं मत बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक हर्षदकुमार सोळंकी यांनी व्यक्त केलं आहे. रेपो दरावरील आधारित व्याजदरातील कपातीमुळे इथून पुढे गृहकर्जावर 6.85 टक्के, वाहन कर्जांवर 7.10 टक्के आणि शैक्षणिक कर्जांवर 6.85 टक्के दराने व्याज आकारण्यात येणार असल्याचे बॅंक ऑफ बडोदाच्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

मारुती सुझुकीची ऑक्टोबरमध्येच दिवाळी!

प्रक्रिया शुल्क शून्य रुपये-
बॅंक ऑफ बडोदाबरोबरच युनियन बॅंक ऑफ इंडियानेही 30 लाखांवरील गृह कर्जासाठी व्याजदर 10 बीपीएसने कमी केला आहे. तसेच महिला कर्जदारांना आणखी सवलत मिळणार आहे. अशा कर्जांसाठी आणखी 5 बीपीएसची सवलत मिळणार आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत गृहकर्जावर शून्य रुपये प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार आहे. व्याजदरातील या सवलती 1 नोव्हेंबर 2020 पासून लागू झाल्या आहेत. तसेच कार आणि शैक्षणिक कर्जासाठीही कोणतेच प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.

ITR भरण्याची मुदत वाढली, पण चुकूनही करु नका उशीर नाहीतर...

बँक ऑफ बडोदाची शुल्कवाढ-
आजपासून बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना बचत खात्यामध्ये दरमहा केवळ तीन वेळेस रक्कम भरता येणार आहे. चौथ्यांदा रक्कम जमा केल्यास त्यांना 40 रुपये ज्यादा द्यावे लागणार आहेत. पण जनधन खातेधारकांना थोडा दिलासा मिळाला आहे. त्यांना बचत खात्यात कितीही वेळा रक्कम जमा करता येणार आहे. मात्र, रक्कम काढण्यास जन धन खाते धारकांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

(edited by- pramod sarawale)