गुंतवणुकीसाठी अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडचा पर्याय

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर पाव टक्का वाढवल्यानंतर अल्प मुदतीतील परतावा वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अल्प मुदतीच्या डेट फंडांमधील गुंतवणूक आकर्षक बनली आहे. ‘डेट’मधून कमी कालावधीत समाधानकारक परतावा मिळवण्यासाठी अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडांतील गुंतवणूक चांगला पर्याय ठरू शकतो, असा सल्ला जाणकारांनी दिला आहे.

वर्षभरात अर्थव्यवस्थेत अनेक घडामोडी झाल्या आहेत. खनिज तेलाच्या किमतींमधील वाढ, चालू खात्यातील वाढती तूट, रुपयातील अवमूल्यन, चलनवाढीचा दर यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. १० वर्षे मुदतीची बेंचमार्क यिल्ड ७.७९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढली आहे. वर्षभरापूर्वी परताव्याचे प्रमाण ६.५ टक्के होते. नजीकच्या काळात व्याजदरांमधील वाढ गुंतवणूकदारांसाठी चांगला परतावा मिळवण्याची संधी घेऊन येणार आहे. केंद्रीय बॅंकांकडून व्याजदर वाढ करणे, व्यापारीयुद्ध आदी घटक व्याजदरांवर परिणाम करतील. अल्प कालावधीसाठी शॉर्ट टर्म डेट फंड, अल्ट्रा शॉर्ट टर्म आणि लिक्विड फंडांचे पर्याय बाजारात आहेत. आयसीआयसीआय प्रुडेंशिअल अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडाने वर्षभरात ६.३५ टक्के परतावा दिला तर याच कालावधीत बेंचमार्क परतावा २.५९ टक्के राहिला.  

गुंतवणूक कुठे?
शॉर्ट टर्म डेट फंडांमधील निधी हा १ ते ३ वर्षांची मुदत असलेल्या बॉण्ड, कॉर्पोरेट डेट, गव्हर्न्मेंट सिक्‍युरिटीज आदी साधनांमध्ये गुंतवण्यात येतो. लिक्‍विड आणि मनी मार्केट फंडांतील निधीची ९१ दिवस ते १ वर्षे मुदतीच्या डेट पेपरमध्ये गुंतवणूक केली जाते. दीर्घ मुदतीच्या फंडांच्या तुलनेत शॉर्ट टर्म फंडावर व्याजदरांतील बदलांचा कमी परिणाम होतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ultra Short Term Fund Option for Investment