हेच का 'अच्छे दिन'?; बेरोजगारीने गाठला 45 वर्षांतील उच्चांक

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 जानेवारी 2019

नवी दिल्ली: देशातील बेरोजगारीचा दर हा गेल्या 45 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचला आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने केलेल्या नियतकालिक श्रम शक्ती या सर्वेक्षणातून ही बाब पुढे अली आहे. सर्वेक्षणाच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, देशात 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर हा 6.1 टक्के इतका आहे. या अहवालानुसार 1972-73नंतर प्रथमच बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या हंगामी अध्यक्षांसह एका सदस्याने काल (सोमवार) दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल आला आहे. नोटाबंदीनंतरची लक्षणीय रोजगार घट दर्शवणारा अहवाल रोखून धरल्याबद्दल राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या सदस्यांनी राजीनामे दिले होते. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या सर्वेक्षणाचा अहवाल अजूनही सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

नोटाबंदीच्या काळात अनेक लघुउद्योग संकटात सापडले होते. शिवाय बऱ्याच उद्योगांना आपले उद्योग बंद करावे लागले. परिणामी नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर लोक बेरोजगार झाले. त्यातच राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या सर्वेक्षणाचा अहवाल अजूनही सार्वजनिक करण्यात न आल्याने राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या हंगामी अध्यक्षांसह एका सदस्याने देखील राजीनामा दिला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unemployment Rate Highest In 45 Years