Amazon India Layoff: कामगार मंत्रालयाने ॲमेझॉनला पाठवली नोटीस; कामगार संघटना आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amazon

Amazon India Layoff: कामगार मंत्रालयाने ॲमेझॉनला पाठवली नोटीस; कामगार संघटना आक्रमक

Amazon India Layoffs : केंद्रीय कामगार मंत्रालयाने Amazon India ला कर्मचार्‍यांच्या सक्तीने कामावरून कमी केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. मंत्रालयाने नोटीस पाठवून बुधवारी बेंगळुरू येथील कामगार आयुक्तांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. मंत्रालयाने आपल्या नोटीसमध्ये लिहिले आहे की, तुम्हाला विनंती करण्यात येत आहे की, तुम्ही या कार्यालयात या तारखेला आणि वेळेला सर्व पुराव्यांसह वैयक्तिकरित्या किंवा प्रतिनिधीद्वारे हजर व्हा.

कर्मचारी संघटना नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (NITES) ने मंत्रालयाकडे तक्रार केली होती आणि अॅमेझॉन इंडियावर कामगार कायद्याचे (Labour Avt) उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कामगार मंत्रालयाने अॅमेझॉन इंडियाला नोटीस बजावली आहे. NITES ने कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून अॅमेझॉन कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर काढत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

अॅमेझॉन इंडियाच्या या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा रोजगार धोक्यात आल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. इंडस्ट्रीज डिस्प्युट ऍक्टचा हवाला देत युनियनने म्हटले आहे की, सरकारच्या परवानगीशिवाय कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकत नाही. NITES चे अध्यक्ष हरप्रीत सलुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, युनियन या प्रकरणी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे.

अॅमेझॉन इंडियाने बेकायदेशीरपणे जारी केलेले स्वेच्छानिवृत्ती धोरण सरकारने तातडीने रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ते म्हणाले की, सरकारने कंपनीला बजावलेल्या नोटीसमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: Paytm Shares Crash : पेटीएमच्या शेअर्समध्ये विक्रमी घसरण; 1.07 लाख कोटींचे नुकसान, 'हे' आहे कारण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Amazon ने आपल्या 10,000 कर्मचार्‍यांना तात्पुरते काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही कर्मचारी कपात 2023 मध्येही सुरू राहील.