Paytm Shares Crash : पेटीएमच्या शेअर्समध्ये विक्रमी घसरण; 1.07 लाख कोटींचे नुकसान, 'हे' आहे कारण

पेटीएमचा स्टॉक 500 रुपयांच्या खाली घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Paytm Shares Crash
Paytm Shares Crashsakal

Paytm Share Price Crash : पेटीएमचा स्टॉक 500 रुपयांच्या खाली घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे. कंपनीने नोव्हेंबर 2021 मध्ये प्रति शेअर 2150 रुपये दराने IPO आणला होता. पण 2150 रुपयांचा शेअर 78 टक्क्यांनी घसरून 477 रुपयांवर आला आहे.

मंगळवारी शेअर बाजार उघडला तेव्हा पेटीएमच्या शेअरची किंमत 535 रुपये होती. पण त्यांतर स्टॉक 11 टक्क्यांहून अधिक घसरला.  500 रुपये किमतीचा शेअर 477 रुपयांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर आला.

हेही वाचा : Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रात पाऊल ठेवणार आहेत. त्यांच्या या हालचालीमुळे पेटीएमसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. मॅक्वेरी ग्रुपने आपल्या अहवालात म्हटले आहे की, या निर्णयामुळे पेटीएम आणि बजाज फायनान्सच्या शेअर्सला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे पेटीएमचे शेअर्सही घसरले आहेत.

यापूर्वी 17 नोव्हेंबर 2022 रोजी, पेटीएमच्या शेअर्सची ब्लॉक डील झाल्यानंतर जपानी गुंतवणूकदार सॉफ्टबँकने ब्लॉक डीलद्वारे पेटीएममधील आपला हिस्सा विकला. तेव्हा पेटीएमच्या स्टॉकमध्ये मोठी विक्री झाली होती. 18 नोव्हेंबर 2022 रोजी पेटीएमच्या आयपीओपूर्वी कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या गुंतवणूकदारांसाठी कालावधी संपला होता. त्यानंतर मोठे गुंतवणूकदार देखील पेटीएमचे शेअर्स विकत आहेत.

Paytm Shares Crash
Wedding Loan : मुलीच्या लग्नाची चिंता सतावतेय? आता बँक देणार खास लग्नासाठी लोन, जाणून घ्या

गुंतवणूकदारांचे 1.07 लाख कोटींचे झाले नुकसान

पेटीएमचा आयपीओ गेल्या वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये आला होता. त्यानंतर कंपनीने 2, 150 रुपये प्रति शेअर या दराने IPO आणला. पण स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाल्यापासून पेटीएमच्या स्टॉकमध्ये घसरण सुरूच आहे. 2, 150  रुपयांचा शेअर आता 477 रुपयांवर घसरला आहे. आयपीओच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक सुमारे 78 टक्क्यांनी घसरला आहे. जेव्हा पेटीएमने 2,150  रुपयांच्या किमतीत IPO आणला तेव्हा त्याची मार्केट भांडवल 1.39 लाख कोटी रुपये होते. आता 31,363 कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांचे सुमारे 1.07 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com