सावधान! SBI मध्ये 'या' गोष्टी अपडेट केल्या नसतील तर व्यवहार...

वृत्तसंस्था
सोमवार, 13 जानेवारी 2020

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सेव्हिंग अकाऊंट आहे? तर मग ही बातमी नक्की वाचा. तुमच्या सेव्हिंग अकाऊंटबाबतीत काही महत्त्वाच्या नोंदी द्यायच्या राहिल्या असतील तर त्या लगेच द्या, नाहीतर तुम्हाला व्यवहार करण्यास अडचण येऊ शकते. 

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सेव्हिंग अकाऊंट आहे? तर मग ही बातमी नक्की वाचा. तुमच्या सेव्हिंग अकाऊंटबाबतीत काही महत्त्वाच्या नोंदी द्यायच्या राहिल्या असतील तर त्या लगेच द्या, नाहीतर तुम्हाला व्यवहार करण्यास अडचण येऊ शकते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तुमच्या अकाऊंटचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अपडेट केला नसेल तर तो लवकरात लवकर अपडेट करून घ्या. या गोष्टी अपडेट केल्याने तुम्ही तुमच्या व्यवहारासंबंधीची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर मिळवू शकता. तसेच सध्या सर्रास होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठीही या अपडेटची मदत होऊ शकते.

तुम्ही तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर अपडेट केला असेल तर, तर कोणत्याही ऑनलाईन व्यवहारापूर्वी त्या नंबरवर ओटीपी किंवा पिन अॅक्टीव्हेशनचा मेसेज येईल. जर तुमचा मोबाईल नंबर अपडेटेड नसेल, तर तुम्ही सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेत 10 हजारांच्यावर पैसे काढू शकत नाहीत. एसबीआयने मागील आठवड्यातच मोबाईल नंबर व ईमेल आयडी अपडेट करण्याबाबत ट्विट केले होते.

नवीन वर्षात "लॉंग टर्म' किंवा "शॉर्ट टर्म'? 

असा करा मोबाईल नंबर, ईमेल आयडी अपडेट -
- एसबीआय इंटरनेट बँकींगला लॉगइन करा
- 'My Accounts & Profile' सेक्शनमध्ये जा
- Profile ऴर क्लिक करा
- Personal Details/Mobile निवडा
- क्विक कॉन्टॅक्टवर क्लिक करा व नंबर एडिट करा
- नवीन मोबाईल नंबर व ईमेल आयडी अपडेट करा
- ओटीपी येईल तो भरा
- ओटीपी भरून 'सबमिट'वर क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: update your mobile number and email id in sbi savings account