
तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. बातमी आहे आधार कार्डवरील नाव, पत्ता किंवा जन्मतारीख अपडेट करण्याबाबतची. तुम्ही नवीन घर घेतलं किंवा तुमच्या जन्म तारखेत चूक असल्यास तुम्हाला तुमच्या आधार कार्डावर त्याबाबतीत बदल करणं गरजेचं आहे. अशात या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वरील बदल करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची मदत होऊ सहकारी त्याची संपूर्ण यादी देणार आहोत. खालील कागदपत्रे तुम्ही तयार ठेवलीत तर अगदी काही मिनिटांत तुमच्या आधार कार्डावरील डिटेल्स अपडेट केले जातील. (updating name, date of birth and address on aadhar card document list)
Aadhaar Card Correction: जाणून घेऊयात यासाठी कोणत्या डॉक्युमेंट्सची आवश्यकता असते.
UIDAI नी दिली माहिती
ज्या संस्थेकडून आधार कार्ड वितरित केले जातात त्या UIDAI या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील पत्ता, जन्मतारीख किंवा नाव बदलायचं आहे तर ते कार्ड वैध आहे आहे ते तुमचंच आहे हे सुनिश्चित करावं लागेल.
कोणते डॉक्युमेंट्स स्वीकारले जातात
UIDAI च्या माहितीनुसार आधार कार्डाच्या 'Proof Of Identity' साठी तब्बल ३२ डॉक्युमेंट्स स्वीकारले जातात. 'Proof Of relationship' साठी १४ डॉक्युमेंट्स स्वीकारले जातात, जन्मदिवसाच्या वैधतेसाठी १५ तर राहत असलेल्या पत्त्याच्या म्हणजेच 'Proof of Address' साठी तब्बल ४५ डॉक्युमेंट्स स्वीकारले जातात.
तुमच्या ओळखीसाठी कोणते डॉक्युमेंट्स स्वीकारले जातात - Proof Of Identity (PoI)
पासपोर्ट
पॅन कार्ड
रेशन कार्ड
वोटर आईडी
ड्रायव्हिंग लायसन्स
पत्यासाठी स्वीकारली जाणारी कागदपत्रे - Proof of Address (PoA)
पासपोर्ट
बँक स्टेटमेंट
पासबुक
रेशन कार्ड
पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट
वोटर आईडी
ड्रायव्हिंग लायसन्स
विजेचं बिल
पाण्याचं बिल
जन्माच्या दाखल्यासाठी स्वीकारली जाणारी कागदपत्रे - DOB Documents
बर्थ सर्टिफिकेट
पासपोर्ट
पॅन कार्ड
तुमचे मार्कशीट्स
SSLC बुक / सर्टिफिकेट
वरील कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर काय कामी येईल
UIDAI च्या माहितीनुसार ज्यांच्याकडे स्वतःच्या नावावर मान्यताप्राप्त कागदपत्र नसल्यास त्यांनी UIDAI ने वैध ठरवलेल्या स्टॅंडर्ड सटिफिकीटचा वापर करून आधार कार्डावरील नाव पत्ता, जन्म तारीख अपडेट करू शकतात.
हे सर्टिफिकीट ग्रुप A किंवा ग्रुप B मधील गॅझेटेड अधिकारी, ग्राम पंचायत प्रमुख, खासदार, आमदार, विधान परिषदेचे सदस्य, म्युनिसिपल काउन्सिलर, तहसीलदार, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे प्रमुख किंवा सुपरिंटेंडेंट, वॉर्डन किंवा मैट्रन, मान्यताप्राप्त शेल्टर होम किंवाअनाथ आश्रमाच्या प्रमुखाच्याच्या वतीने जारी केलेले असायला हवे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.