दिवाळीत 'किती' होतील सोन्याचे दर, दिग्गजांनी दिलेत मोठे टार्गेट्स

Gold
GoldGoogle

Gold Price Outlook 2021: सोन्याच्या किमतीत (Gold Price) सतत चढ उतार सुरू आहेत. सोने सध्या 46,990 रुपये प्रति 10 ग्राम आहे. येत्या काळात सोन्याच्या दरात चढ उतार बघायला मिळतील असे इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स आसोसिएशन यांचे म्हणणे आहे. सोन्याच्या (Gold price news in Hindi) किंमतीत अपसाइड मूमेंट दिसतोय त्यामुळेच सोने आपला आधीचा रेकॉर्ड तोडू शकेल. सोन्याबरोबरच चांदीचीही घोडदौड सुरू आहे. सध्या चांदीचा भाव 68,700 रुपये आहे.

Gold outlook 2021: दिवाळी पर्यंत सोन्याचे दर गाठणार 60 हजारांचा पल्ला

कोरोनामुळे मार्केटमध्ये अनिश्चितता आहे आणि सोन्याचे दर कमी आहेत, त्यामुळे आताच गुंतवणूकदारांनी सोन्यात पैसे गुंतवावे असेकेडिया कमोडिटीचे डायरेक्टर अजय केडिया यांचे म्हणणे आहे. कारण सोन्याचे दर तेजीनंतर (Gold price outlook) बरेच वाढतील असा अंदाज आहे. दिवाळीपर्यंतसोने 60 हजार रुपये तोळा होऊ शकते.

गुंतवणूकदारांसाठी (Gold price today) सगळ्यात सुरक्षित इनव्हेस्टमेंट असल्याचे IIFL सिक्यूरिटीजचे व्हाइस प्रेसिडेंट (कमोडिटी अँड करंसी) अनुज गुप्ता यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच येत्या काळात सोन्याचे दर पुन्हा आकाशाला भिडतील असाही अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

Gold
तुमच्या SIP ला द्या Top-Up; फायदा होईल दुप्पट, कॅलक्युलेटर वर करा चेक...

का वाढतील सोन्याचे दर (gold price) - जाणून घेऊयात 5 महत्त्वाची कारणे

पाहिले कारण-कोरोनामुळे जगभर अनिश्चिततेचे वातावरण आहे, शेअर बाजारात चढ उतार बघायला मिळत आहे, अशात गुंतवणूकदार शेअर्समधील पैसे काढून सोन्यात गुंतवतात. त्यामुळे सोन्याचे दर (Gold rate outlook) वाढतात. 2020 मध्ये अशीच वाढ दिसली आणि सोन्याने 56,200 रुपायांचारेकॉर्ड केला होता.

दूसरे कारण-आंतरराष्ट्रीयबाजारात US डॉलर आणखी मजबूत आणि जुलैमध्ये US Job data ट्रिगर होतील आणि त्यावर नजर ठेवणे गरजेचे आहे. रुपयाही डॉलरच्या तुलनेत कमजोर आहे आणि त्यामुळेही सोन्याच्या किमती वाढू शकतील.

Gold
चार वर्षानंतर पहिल्यांदाच इतकं घसरलं सोनं

तिसरे कारण-चीनमधील सेंट्रल बँक सोन्यात रिझर्व्ह (Gold reserve) वाढवत आहे. मे महिन्यातच बँकांना सोने इंपोर्ट करायची परवानगी दिली आहे.

चौथे कारण-देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. पण आंतरराष्ट्रीय बाजारात सोने थोड्या ताकदीने व्यवसाय करत आहे. सध्या सोन्याची किंमत प्रति आऊंस 1,755 अमेरिकी डॉलरआहे.

पाचवे कारण-किरकोळ आणि घाऊक चलनवाढीमुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये (Gold-Silver Price update) वाढ दिसून येते. म्हणूनच गुंतवणूकदारांनी सपोर्ट लेव्हल लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com