भारतावर निर्बंधांचा अमेरिकेचा इशारा 

पीटीआय
गुरुवार, 28 जून 2018

वॉशिंग्टन - इराणमधून ३ नोव्हेंबरनंतर खनिज तेलाची आयात सुरू ठेवल्यास भारत आणि चीनसह सर्व देशांवर निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असेही अमेरिकेने नमूद केले. 

इराक आणि सौदी अरेबियानंतर इराण हा भारताचा सर्वांत मोठा तेल पुरवठादार देश आहे. इराणमधून भारताला एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत १.८४ कोटी टन खनिज तेलाचा पुरवठा झाला होता. इराणशी झालेल्या अणू करारातून अमेरिका बाहेर पडला असून, इराणवर निर्बंध लादण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. या निर्बंधानुसार इतर सहकारी देशांनी इराणशी व्यापार थांबवावा, अशी मागणी अमेरिकेने केली आहे.

Web Title: US warning of restrictions on India