esakal | ‘ग्लॅंड फार्मा’चा ‘आयपीओ’ कसा आहे?
sakal

बोलून बातमी शोधा

‘ग्लॅंड फार्मा’चा ‘आयपीओ’ कसा आहे?

देशभरात चीनविरोधी वातावरण असल्याने खरे तर ही भागविक्री करणे सोपे नाही. तरीही कंपनी तयार करीत असलेल्या औषधांना देशात; तसेच जगभरात मोठी मागणी आहे.

‘ग्लॅंड फार्मा’चा ‘आयपीओ’ कसा आहे?

sakal_logo
By
वल्लरी देशपांडे

फार्मा क्षेत्रातील सर्वांत मोठा ‘आयपीओ’ ता. ९ ते ११ नोव्हेंबर दरम्यान शेअर बाजारात विक्रीसाठी येत आहे. शांघाई फोसन फार्माचा मोठा हिस्सा असलेल्या हैदराबादच्या ‘ग्लॅंड फार्मा’ने आपल्या ‘आयपीओ’तून ६५०० कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी ३.४९ कोटी शेअरची विक्री केली जाईल. फोसनद्वारे १.९ कोटी शेअरची विक्री, तर ग्लॅंड सेल्सस बायो केमिकल्स १ कोटी शेअरची विक्री करणार आहे. एम्पॉवर डिस्क्रशनरी ट्रस्ट व नीलय डिस्क्रशनरी ट्रस्ट अनुक्रमे ३५.७३ लाख व १८.४५ लाख शेअरची विक्री करणार आहेत. कंपनीची समभागविक्री रु. १४९० ते १५०० या किंमतपट्ट्यात होणार आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आर्थिक बाजू 
‘ग्लॅंड फार्मा’चे मागील वर्षाचे उत्पन्न २७७२ कोटी रुपये, तर त्या आधीच्या वर्षी २१२९.७ कोटी रुपये होते. २०१९-२० मध्ये कंपनीचा निव्वळ नफा ७७२.८ कोटी, तर त्याआधी तो ४५१.८ कोटी रुपये होता. या ‘आयपीओ’मुळे बाजारात नव्या गुंतवणुकीचा उत्साह दिसू शकतो. 

गुणवैशिष्ट्ये
कंपनीची इतर उत्पादने; तसेच बिझनेस मॉडेल, उत्पादनांची गुणवत्ता व भक्कम बॅलन्सशीट या जमेच्या बाजू आहेत. चीनची कंपनी प्रमोटर असणे, ही कंपनीसाठी सर्वांत मोठी चिंता असू शकते. देशभरात चीनविरोधी वातावरण असल्याने खरे तर ही भागविक्री करणे सोपे नाही. तरीही कंपनी तयार करीत असलेल्या औषधांना देशात; तसेच जगभरात मोठी मागणी आहे. सद्यःस्थितीत ही कंपनी मुख्यतः हैदराबादची असल्यामुळे व फार्मा क्षेत्राला सध्या चांगले दिवस असल्यामुळे हा ‘आयपीओ’ गुंतवणुकीसाठी अर्ज करण्यासारखा वाटतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(डिस्क्लेमर ः लेखिका ‘आयपीओ’तील जाणकार आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील मत व्यक्त केले आहे. वाचकांनी शेअर बाजारातील जोखीम ओळखून गुंतवणुकीबाबतचा निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)    

loading image