
Share Market : टेक्सटाइल सेक्टरमधला 'हा' शेअर देईल तगडा परतावा...
शेअर बाजारात सध्या तेजीचा ट्रेंड दिसून येतोय. यात तेजीत दामदुप्पट परतावा मिळवण्यासाठी तुम्हालाही काही शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला ऐकू शकता. मार्केट तज्ज्ञ संदीप जैन यांनी पैसे गुंतवण्यासाठी टेक्सटाइल सेक्टरमधील मजबूत आणि सर्वोत्तम स्टॉक निवडला आहे. यात गुंतवणूक करुन तुम्हाला चांगला परतावा मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मार्केट तज्ज्ञ संदीप जैन यांनी खरेदीसाठी वर्धमान टेक्सटाइल्सची (Vardhman Textiles) निवड केली आहे. या शेअरमध्ये येत्या काळात चांगली तेजी दिसून येईल असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा: Income tax return : ITR Filingची मुदत वाढण्याची वाट पाहात असल्यास हे वाचा
वर्धमान टेक्सटाइल्स (Vardhman Textiles) ही कंपनी चांगली असून गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक केल्यास फायदाच होईल असेही जैन म्हणाले. हा शेअर नुकताच वरुन करेक्ट झाला आहे आणि 576 रुपयांच्या हायवरुन खाली गेला आहे. त्यामुळे यात चांगला परतावा मिळवण्याची ताकद असल्याचे जैन म्हणाले.
वर्धमान टेक्सटाइल्स (Vardhman Textiles)
सीएमपी (CMP) - 305.60 रुपये
टारगेट (Target) - 370/390 रुपये
कंपनीचे फंडामेंटल्स ?
हेही वाचा: Gold-Silver Price: वीकेंडला सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
कंपनीचे फंडामेंटल्स अतिशय भक्कम आहेत आणि ते फक्त 6 च्या पीई मल्टिपलवर ट्रेडिंग करत आहे. कंपनीचा इक्विटीवर परतावा 22 टक्के आहे. ही कंपनी 2 टक्क्यांपेक्षा जास्त डिव्हिडेंड यील्ड देते. ही एक टेक्सटाइल कंपनी आहे आणि तिला पीएलआय योजनेचा फायदा होतो. कंपनीने जून 2022 तिमाहीत 329 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता, तर जून 2021 मध्ये 315 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Vardhman Textiles Shares Will Get Best Return In Textile Industry Upcoming Days
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..