Income tax return | ITR Filingची मुदत वाढण्याची वाट पाहात असल्यास हे वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ITR

Income tax return : ITR Filingची मुदत वाढण्याची वाट पाहात असल्यास हे वाचा

मुंबई : उद्या इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ३१ जुलै आहे. जर तुम्ही अद्याप रिटर्न भरला नसेल तर हे काम त्वरित करा, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

आयकर विभागाने अद्याप मुदत वाढवण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. तथापि, आयटीआर भरणाऱ्या लोकांची संख्या पाहता, काही तज्ज्ञांचा अंदाज आहे की ही मुदत वाढवली जाऊ शकते. त्याच वेळी, काही तज्ज्ञ म्हणतात की अंतिम मुदत वाढवण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा: Income Tax Return : अजुनही Refund मिळाला नाही? जाणून घ्या काय आहेत कारणं

इन्कम टॅक्स इंडियाच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलैपर्यंत ४०९ कोटी युजर्सनी आयटीआर दाखल केला आहे. यापैकी सुमारे ३६ लाख वापरकर्त्यांनी २८ जुलै रोजी आयटीआर दाखल केला आहे.

हेही वाचा: Income Tax Return: चुकीची दुरुस्ती करण्याची संधी

तज्ज्ञ काय म्हणतात :

ऑप्टिमा मनी मॅनेजर्सचे एमडी आणि सीईओ पंकज मठपाल म्हणतात, "एक वर्षापूर्वी, आयटीआर फाइल करणाऱ्यांची एकूण संख्या ६.६८ कोटी होती. त्याच वेळी, सप्टेंबर २०२१पर्यंत, आयटीआर फाइल करणाऱ्यांची एकूण संख्या सुमारे ५.७० कोटी होती.

जर आपण २८ जुलै २०२२पर्यंत दाखल केलेल्या एकूण आयटीआरच्या संख्येशी तुलना केली तर फरक सुमारे १.७ कोटी इतका येतो. हा खूप मोठा फरक आहे, त्यामुळे आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत विचारात घेतली जाऊ शकते."

त्याच वेळी, ट्रान्ससेंड कॅपिटल येथील वेल्थचे संचालक कार्तिक झवेरी म्हणाले, "आयटी विभागाच्या संदेशात असे लिहिले आहे की 28 जुलै रोजी दाखल केलेल्या आयटीआरची एकूण संख्या सुमारे 36 लाख आहे. 31 जुलैपर्यंत ही संख्या सहजपणे 5 कोटींचा आकडा पार करू शकते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शेवटच्या क्षणी रिटर्न फायलींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. असे झाल्यास हा आकडा 5.35 कोटी ते 5.5 कोटींच्या आसपास येईल. अशा परिस्थितीत मुदत वाढण्याची शक्यता कमीच आहे."

Web Title: Income Tax Return Read This If You Are Waiting For Extension Of Itr Filing Deadline

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Income Tax Return