वेदांताची याचिका न्यायाधीशांच्या समितीकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली - तमिळनाडूतील तुतीकोरिन येथील स्टरलाइट कॉपर प्रकल्प बंद करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या वेदांता या खाण कंपनीची याचिका राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) एका माजी न्यायाधीशांच्या समितीकडे सोपविली. ए. के. गोयल यांच्या अध्यक्षतेखालील एका पीठाने सांगितले, की या समितीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण मंत्रालयाच्या प्रतिनिधींचाही समावेश असेल. लवादाने समितीला दोन आठवड्यांत कामाला सुरवात करून सहा आठवड्यांत या प्रकरणावर निर्णय घेण्यास सांगितले आहे. समितीच्या अध्यक्षांचे नावावर लवकरच निर्णय घेतला जाईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vedanta Petition give to court committee