Vehicle Insurance : वाहनाचा विमा नसेल तर सावधान! होऊ शकते कारवाई; वाचा काय आहेत नियम

कोणतेही वाहन रस्त्यावर चालवताना त्या वाहनाचा विमा असणे गरजेचे आहे.
Vehicle insurance
Vehicle insurancesakal

आयुष्यात गाडी घेणे हे जवळपास प्रत्येकाचे स्वप्न असते. गाडी घेताना मोठी गुंतवणूक केली जाते. अनपेक्षित नुकसानीपासून वाचण्यासाठी सर्व कागदपत्रे आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण करून विम्याची तरतूद केली जाते. वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे.

विमा नसल्यास तुमचे वाहन कायद्यानुसार बेकायदा ठरते. ज्यावेळी पोलिस गाडी थांबवतात, त्यावेळी विमा असणे गरजेचे आहे. आरटीओ विभाग देखील विमा नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करू शकते. न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनांचा विमा नसेल तर अशा वाहन चालकांवर 300 रुपये ते 2000 रुपये एवढा दंड आकाराला जातो.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

विमा नसताना वाहन पकडले तर दंड भरुन सुटका होऊ शकते, मात्र विमा नसताना तुमच्याकडून अपघात झाला तर मात्र मनस्तापाशिवाय काहीही पर्याय नाही. अपघात किरकोळ असेल तर वाहनाचे नुकसान भरून कदाचित सुटका होईल, मात्र अपघातात कुणाचा मृत्यू झाला तर तुमचे जास्त नुकसान होऊ शकते.

कोणतेही वाहन रस्त्यावर चालवताना त्या वाहनाचा विमा असणे गरजेचे आहे. दुचाकी, तीनचाकी अथवा चारचाकी हा नियम सगळ्यांना लागू आहे. वाहन चालवताना अपघात झाला तर विमा नसल्यास कोणतीही भरपाई अपघातग्रस्त वाहनासह व्यक्तीला मिळत नाही. तसेच आपल्यामुळे दुसऱ्या वाहनाचे अपघातात नुकसान झाले असेल तर त्याच्या वाहनाचा खर्च खिशातून द्यावा लागतो. विमा असेल तर संबंधित विमा कंपनीद्वारे तो दिला जातो. त्यामुळे वाहनांना विमा काढणे अत्यंत गरजेचे आहे.

Vehicle insurance
FD Interest Rate : FD मध्ये गुंतवणूक करताय? जाणून घ्या कोणत्या बँका देत आहेत जास्त व्याज

वाहनाचा विमा काढताना शक्यतो थर्ड पार्टी विमा काढला जातो. त्या विम्याची रक्कम काही रुपयांमध्ये असते. पोलिसांनी वाहन पकडले आणि विमा नसेल तर 2 हजार रुपयांपेक्षा अधिक दंड लावला जाऊ शकतो. त्यामुळे कधीही वाहनाचा विमा असणे फायदेशीर ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com