
व्हिनस पाईप्स आणि ट्यूब्सचा IPO 11 मे रोजी खुला होणार, जाणून घ्या प्राईस बँड
Venus Pipes & Tubes IPO: व्हिनस पाईप्स आणि ट्यूब्सचा IPO 11 मे रोजी खुला होणार असून13 मे रोजी बंद होईल. यासाठी प्राईस बँड प्रति शेअर 310-326 रुपये निश्चित करण्यात आला आहे. कंपनीचा 165 कोटी रुपयांचा IPO असणार आहे. अँकर इन्वेस्टर्ससाठी 10 मे रोजी आयपीओ खुला होईल.
IPO अंतर्गत कंपनीचे 50.74 लाख इक्विटी शेअर्स विकले जातील असे Venus Pipes & Tubes ने सांगितले. त्यातून 165.41 कोटी रुपयांची उभारणी अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
इश्यूमधून मिळालेली रक्कम व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स कंपनी क्षमता विस्तार, खेळत्या भांडवलाची आवश्यकता आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाणार आहे. कंपनीची 'व्हीनस' ब्रँडचे प्रॉडक्ट्स केमिकल, इंजिनिअरिंग, फर्टिलायझर्स, औषधनिर्माण, ऊर्जा, अन्न प्रक्रिया, कागद आणि तेल आणि वायू अशा विविध क्षेत्रात पुरवली जातात. Venus Pipes & Tubes ही स्टेनलेस स्टील पाईप्स आणि ट्यूब्सची मॅन्युफॅक्चरर आणि एक्सपोर्टर आहे.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Venus Pipes Tubes Ipo Date Price Gmp Review Details
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..