लंडनच्या न्यायालयाकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी

वृत्तसंस्था
सोमवार, 10 डिसेंबर 2018

लंडन: देशातील बँकांना सुमारेनऊ हजार  कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट्स न्यायालयाने मल्ल्याच्या विरोधात निकाल देत प्रत्यार्पण करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. शिवाय भारतीय बँकांनी देखील कर्ज देताना नियम मोडले असल्याचे न्यायालयाने सांगितले. मात्र आता वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट्स न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात मल्ल्या तेथील उच्च न्यायालयात पुन्हा अपील करण्याची शक्यता देखील आहे. अपिल करण्यासाठी विजय मल्ल्याला 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 

आपण कोणाचेही पैसे चोरलेले नाहीत असे मल्ल्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मी बँकांचे कर्ज फेडण्यास तयार आहे. शिवाय मी कर्ज फेडण्याची दाखवलेली तयारी बनावट नसून खरी आहे असेही त्याने सांगितले. बँकांचे 100 टक्के कर्ज परत करण्यास तयार आहे मात्र त्यावरील व्याज भरू शकण्यास मी असमर्थ आहे, असे त्याने यावेळी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Mallya To Be Extradited, Says UK Judge