कर्जबुडव्यांचा मी पोस्टर बॉय! - विजय मल्ल्या

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

बंगळूर - बॅंकांना सुमारे ९ हजार कोटी रुपयांना गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने दोन वर्षांनंतर आपले मौन सोडत मी कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय झालो आहे, अशी खंत आज व्यक्त केली. बॅंकांचे कर्ज भरण्यासाठी सुरू असलेल्या आपल्या प्रयत्नांना राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या घटकांच्या हस्तक्षेपामुळे खीळ बसली असल्याचा दावाही त्याने केला आहे.

मल्ल्या याने याबाबत एक निवेदन जारी केले असून, त्यात त्याने जाणीवपूर्वक कर्ज बुडविल्याचा आरोप फेटाळला आहे. मी १५ एप्रिल २०१६ रोजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांना एक पत्र लिहून आपली बाजू मांडली होती. मात्र दोघांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असा खुलासा मल्ल्या याने केला. 

विजय मल्ल्याने विविध बॅंकांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्या युनाटेड ब्रेवरीज होल्डिंग लिमिटेड (यूबीएचएल) या कंपनीची सुमारे १३ हजार ९०० कोटी रुपयांची मालमत्ता विकण्याची तयारी दर्शविली आहे. सदर मालमत्तेच्या विक्रीसाठी कर्नाटक उच्च न्यायालयाकडे अर्जाद्वारे परवानगी मागितली असल्याची माहिती मल्ल्या याने दिली. 

विजय मल्ल्या याला खरंच बॅंकांचे कर्ज भरायचे होते, तर त्याच्याकडे अनेक वर्षांचा कालावधी होता. या कालावधीत तो खूप काही करू शकला असता. मात्र त्याने तसे केले नाही. 
- एम.  जे. अकबर, परराष्ट्र राज्यमंत्री

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Mallya Loan Poster Boy