कमाईची संधी! 1895 कोटींचा IPO येणार, एका शेअरची किंमत 531 रुपये

IPO
IPOSakal

डायग्नोस्टिक चेन विजया डायग्नोस्टिक सेंटरने आपल्या इनिशियल पब्लिक ऑफरसाठी (IPO) प्राईस बँड निश्चित केला आहे. त्यासाठी कंपनीने प्रति शेअर 522-531 रुपये प्राईस बँड (Price Band) निश्चित केला आहे. या माध्यमातून 1895 कोटी जमा करण्याची योजना आहे. विजया डायग्नोस्टिक आयपीओ पुढच्या आठवड्यात 1 सप्टेंबरला सुरू होईल. 3 सप्टेंबरपर्यंत त्यात गुंतवणूक केली जाऊ शकते. हा आयपीओ ऑफर फॉर सेल (OFS) आहे ज्यात प्रवर्तक (Promotors) आणि गुंतवणूकदार त्यांचा हिस्सा कमी करतील. तुम्ही या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर आधी संपूर्ण तपशील जाणून घ्या.

पुर्णतः ऑफर फॉर सेल (OFS)

विजया डायग्नोस्टिकचे फ्रेश इक्विटी शेअर्स जाहीर केले जाणार नाहीत. हे पुर्णतः ओएफएस असतील, ज्यात 3,56,88,064 इक्विटी शेअर्स विकले जातील. आयपीओचे प्रवर्तक (Promoter) एस सुरेंद्रनाथ रेड्डी आणि गुंतवणूकदार काराकोरम लिमिटेड आणि केदारा कॅपिटल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड यांच्या वतीने 35 टक्के हिस्सा विकला जाईल. डॉ. एस. सुरेंद्रनाथ रेड्डी 50.95 लाख शेअर्स आणि काराकोरम लिमिटेड 2.94 कोटी इक्विटी शेअर्स विकतील. तर केदारा कॅपिटल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड-केदारा कॅपिटल एआयएफ 1 द्वारे 11.02 लाख शेअर्स विकतील.

IPO
अजित पवार अज्ञानी आहेत, नारायण राणेंचा उपमुख्यमंत्र्यावर पलटवार

कोणासाठी किती शेअर्स राखीव

आयपीओचा 50 टक्के भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (Qualified Institution buyers) आणि 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव (Retail Investors) ठेवण्यात आला आहे. उर्वरित 15 टक्के संस्थात्मक नसलेल्या खरेदीदारांसाठी (Non Institutional Buyers) राखीव असेल. 1.5 दशलक्ष इक्विटी शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज (ICICI Securities), आयडलवाइज फायनान्शियल सर्व्हिसेस आणि कोटक महिंद्रा कॅपिटल यांची आयपीओसाठी गुंतवणूक बँकर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IPO
संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करु, निलेश राणेंचा इशारा

कंपनीचा व्यवसाय

विजया डायग्नोस्टिक आपल्या मोठ्या नेटवर्कद्वारे पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजीच्या चाचण्यांची सेवा देते. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कोलकाता आणि एनसीआर मध्ये 80 निदान केंद्रे (Diagnostic Centers) आणि ११ संदर्भ प्रयोगशाळा (Refference Laboratory) आहेत. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा 84.91 कोटी रुपयांवर पोहोचला. तर कंपनीचे उत्पन्न सुमारे 389 कोटी रुपये होते. डायग्नोस्टिक सेंटरशी संबंधित खर्च 8 ते 14 टक्के इतका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com