संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करु, निलेश राणेंचा इशारा

संजय राऊत
संजय राऊत File photo

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वादाचा दुसरा अंक सध्या सुरु झाला आहे. राणे यांना अटक झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. राज्यात आता राणे विरुद्ध शिवसेना असा सरळ वाद सुरु झाला आहे. हा वाद थांबण्याचं नाव घ्यायला तयार नाही. आता शिवसेना नेते आणि राणे यांच्यात शाब्दिक हल्लाबोल सुरु झाला आहे. यामध्ये आता नारायण राणे यांच्या मुलांनीही उडी घेतली आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांचा करेक्ट कार्यक्रम करु, अशा कठोर शब्दात निलेश राणे यांनी इशारा दिला आहे. निलेश राणे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना नारायण राणे यांचा पुन्हा एकदा करेक्ट कार्यक्रम करु, असं म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांनीही संजय राऊत यांना इशारा दिला. ते म्हणाले की, 'करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय? संजय राऊत बोगस माणूस आहे. आम्ही जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा कार्यक्रम करू.'

संजय राऊत यांचा समाचार घेतनाच आम्ही शिवसेनाला भीक घालत नाही, जन आशीर्वाद यात्रा पूर्ण करणारच, असेही निलेश राणे म्हणाले. यावेळी बोलताना निलेश राणे यांनी संजय राऊत यांना आव्हान दिले आहे. संजय राऊत यांनी आमच्या गर्दीत एकदा उभं राहवं. मग साहेबांचे विचार काय आहेत ते पहावे, असे निलेश राणे म्हणाले. पुढे बोलताना निलेश राणे यांनी शिवसेनेकडे आचार-विचार राहिले नाहीत. फक्त शिवसेना अडवा-अडवीची काम करते. आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही, अशी टीका केली.

संजय राऊत
लग्नाला 2 हजार जणांची गर्दी, शिवसेना नेत्यासह 6 जणांवर गुन्हा

राणेंच्या स्वाथ्यासाठी प्रार्थना करावी - संजय राऊत

‘‘नारायण राणे यांची प्रकृती चांगली नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी रोज एक मिनीट प्रार्थना करावी. तसेच राणे यांनी योग करावा,’’ असा सल्ला शिवसेनेचे संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी दिला. राणे यांची जीभ वारंवार घसरत असल्याने एकदा कायदेशीर लगाम लावणे गरजेचे होते. त्यांच्या अटकेमुळे महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दरम्यान राणे यांचे मनःस्वास्थ्य बिघडले आहे. मला त्यांची चिंता वाटते. त्यांच्या मुलांनी त्यांना जास्त त्रास देऊ नये. अटक होण्याच्या वेळी त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाने रोज एक मिनिट राणे यांना मनस्वास्थ लाभावे यासाठी प्रार्थना करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com