विस्तारा एअरलाईन्सची मुंबई ते कोलंबो थेट सेवा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

 विस्तारा एअरलाईन्सने प्रथमच प्रवाशांसाठी प्रीमियम इकाॅनाॅमी क्लासची सुविधा उपलब्ध केली आहे.

मुंबई : टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सची भागीदारी असलेल्या विस्तारा एअरलाईन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विस्तारातर्फे मुंबईतून कोलंबोसाठी २५ नोव्हेंबरपासून दररोज (बुधवार वगळता) थेट सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि श्रीलंकादरम्यान प्रथमच प्रीमियम इकॉनॉमी क्‍लासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कंपनीतर्फे सुरवातीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कमी खर्चात परतीचे तिकीट मिळणार आहे. मुंबईतून निघालेल्या पहिल्या विमानातून कोलंबो येथे गेलेल्या सर्व प्रवाशांचे विस्तारातर्फे विमानतळावर पुष्पहार घालून व मिठाईचे वाटप करून स्वागत करण्यात आले.

या वेळी श्रीलंकेतील प्रसिद्ध नृत्यही तेथील कलाकारांनी सादर केले. विस्ताराच्या या सेवेमुळे श्रीलंकेतील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्‍वास येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केला.

मुंबई-कोलंबो सेवेची वैशिष्ट्ये 

  • दररोज (बुधवारवगळता) मुंबई-कोलंबो-मुंबई थेट सेवा 
  •  एअरबस ए 320 विमानाद्वारे सेवा 
  •  मुंबई ते कोलंबो - सकाळी 11 ते दुपारी 1.25 
  •  कोलंबो ते मुंबई - दुपारी 2.25 ते सायंकाळी 5 
  •  मुंबईतून दिवसा कोलंबोसाठी जाणारी एकमेव सेवा 
  •  बिझनेस, प्रीमियम क्‍लास, इकॉनॉमी क्‍लास उपलब्ध 
  •  विमानात टीव्ही शो, आवडीचे चित्रपट आणि संगीताची सुविधा 

web title : vistara Airlines direct flights from Mumbai to Colombo


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vistara Airlines direct flights from Mumbai to Colombo