व्होडाफोन आयडियाला ५ हजार कोटींचा तोटा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

मुंबई - व्होडाफोन आयडिया कंपनीला डिसेंबरअखेर संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत ५ हजार ४ कोटी रुपयांचा तोटा झाला. रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केल्यापासून या क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. कंपनीला सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ४ हजार ९७४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीचा विलीनीकरणाचा खर्च तिसऱ्या तिमाहीत १ हजार ९९९ कोटी रुपयांवर गेला आहे. याआधीच्या तिमाहीत हा खर्च ४५.४ कोटी रुपये होता. व्होडाफोनचा प्रतिग्राहक सरासरी महसूल ८९ रुपयांवर गेला आहे. दुसऱ्या तिमाहीत तो ८८ रुपये होता. कंपनीवरील एकूण कर्ज १.२३ लाख कोटी रुपये आहे.

मुंबई - व्होडाफोन आयडिया कंपनीला डिसेंबरअखेर संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत ५ हजार ४ कोटी रुपयांचा तोटा झाला. रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केल्यापासून या क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. कंपनीला सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ४ हजार ९७४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीचा विलीनीकरणाचा खर्च तिसऱ्या तिमाहीत १ हजार ९९९ कोटी रुपयांवर गेला आहे. याआधीच्या तिमाहीत हा खर्च ४५.४ कोटी रुपये होता. व्होडाफोनचा प्रतिग्राहक सरासरी महसूल ८९ रुपयांवर गेला आहे. दुसऱ्या तिमाहीत तो ८८ रुपये होता. कंपनीवरील एकूण कर्ज १.२३ लाख कोटी रुपये आहे. यात सरकारला स्पेक्‍ट्रमपोटी द्यावयाच्या ९१ हजार ४८० कोटी रुपयांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vodafone Idea to lose Rs 5000 crore